चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्षाची सवय घातक; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:38 AM2023-05-31T10:38:39+5:302023-05-31T10:40:48+5:30
गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या दहा वर्षांत गोवा राज्य सर्वच क्षेत्रात विकास करीत आहे. मात्र, काही लोकांना चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवय झाली आहे. ते चांगल्या गोष्टींचे कौतुक न करता केवळ टीकाच करतात, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांना लगावला. दोनापावल येथील राजभवनमध्ये आयोजित गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककला, तर पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतसाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आमदार दिगंबर कामत, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, कला व संस्कृती खात्याचे सचिव मिनीनो डिसोझा, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव सुभाष चंद्र व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'कला व साहित्य क्षेत्रात गोव्यात अनेक रत्ने तयार झाली आहेत. या कलाकारांच माहिती भावी पिढीला मिळावी कलाकारांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचे कौतुक गोमंत विभूषण पुरस्काराद्वारे केले जाते गोवामुक्तीनंतर जन्माला आलेला म एकमेव मुख्यमंत्री आहे. आज गोव्यातील लोककला, कलाकारांनी संगीत व साहित्य क्षेत्रात केलेल्य कामाचे जतन अर्थात त्याचे रेकॉ ठेवले जात आहे. कला व संस्कृती खात्याने ही प्रक्रिया सुरू केली आहे भावी पिढीला त्याचा मोठा फायद होईल. गोव्यात कला व संस्कृतील मोठा वाव आहे. आज येथील तरुणांना संगीत शिकण्यासाठी महाविद्यालय तसेच अनेक संस्था उपलब्ध आहेत.'
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, 'गोवा ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. गोव्याच्या संगीताला जागतिक किर्ती मिळत आहे. भारतीय संगीताचाही जगभरात प्रसार होत आहे. खेडेकर व कारेकर यांना गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करणे, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे', असे त्यांनी सांगितले.
पन्नास वर्षांतील कामाशी तुलना करा
'सध्याचा काळ हा असा आहे, की जिथे लोकांना चांगले ऐकण्याची, बघण्याची सवय नाही. राज्याने मागील १० वर्षात सर्व क्षेत्रात विकास साधला. मात्र, काहींना तो पाहायचा नसून ते केवळ टीकाच करतात. खरेतर त्यांनी मागील ५० वर्षे आणि आताच्या १० वर्षातील विकासाची तुलना करणे अपेक्षित आहे. राज्याचा विकास, सर्व कामे मीच केली, असे म्हणत नाही. यात सर्वांचे योगदान आहे. मुख्यमंत्री या नात्याने चांगले व वाईट अशा दोन्ही गोष्टी ऐकण्याची माझी तयारी आहे,' असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.