मडगावात कारवर पडला माड, दैव बलवत्तर, चेन्नई एफसीचे चार खेळाडू बचावले
By सूरज.नाईकपवार | Updated: April 15, 2024 17:43 IST2024-04-15T17:43:17+5:302024-04-15T17:43:57+5:30
वाहन चालकाच्या दक्षतेमुळे खेळाडू बचावले.

मडगावात कारवर पडला माड, दैव बलवत्तर, चेन्नई एफसीचे चार खेळाडू बचावले
सूरज नाईकपवार, मडगाव : धावत्या कारवर माड कोसळून पडण्याची घटना कोंब - मडगाव येथे रविवारी रात्री उशीरा घडली. सुदैवाने हा माड कारच्या आरशावर पडला. या कारमधून चेन्नई एफसी क्लबचे चार खेळाडू प्रवास करीत होते. वाहन चालकाच्या दक्षतेमुळे हे खेळाडू बचावले.
काल रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चेन्नईयन एफसी आणि एफसी गोवा यांच्यात सामना होता. घरच्या मैदानावरील हा सामना एफसी गोवाने जिंकला. या सामन्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. किरण कदम हा टॅक्सीचालक या खेळाडूंना फातोर्डा स्टेडियमवरुन घेऊन बाणावली येथे एका रिसाेर्टमध्ये जात होता. कार घेऊन जात असताना अचानक कोंब येथे माड कारवर कोसळला. तो कारच्या आरशावर पडला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. देवाच्या कृपेने मोठा अनर्थ टळला असे कदम यांनी सांगितले.