तान्हुलीला प्लास्टिक पिशवीत गुंंडाळून सोडले. निर्दयी मातेला अटक

By सूरज.नाईकपवार | Published: March 27, 2024 04:37 PM2024-03-27T16:37:12+5:302024-03-27T16:37:36+5:30

फातोर्ड पोलिसांनी या प्रकरणी त्या निर्दयी आईला अटक केली आहे. तीने आपला गुन्हा मान्य केला असला तरी हे कृत्य करण्यामागील नेमके कारण सांगितले नाही.

The infant was left wrapped in a plastic bag. Ruthless mother arrested | तान्हुलीला प्लास्टिक पिशवीत गुंंडाळून सोडले. निर्दयी मातेला अटक

तान्हुलीला प्लास्टिक पिशवीत गुंंडाळून सोडले. निर्दयी मातेला अटक

मडगाव: पोटाच्या उदरात नउ महिने वाढविलेल्या आपल्या तान्हुलीला घरासमोर प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडून देण्याची खळबळजनक घटना गोव्यातील बोर्डा येथे आज बुधवारी घडली. फातोर्ड पोलिसांनी या प्रकरणी त्या निर्दयी आईला अटक केली आहे. तीने आपला गुन्हा मान्य केला असला तरी हे कृत्य करण्यामागील नेमके कारण सांगितले नाही. ती मुलगी साधारणा दीड महिन्याची आहे. प्रियंका रिचर्ड फर्नांडीस (३०) असे संशयिताचे नाव आहे. या एकंदर घटनेमुळे बोर्डा भागातही एकच खळबळ माजली.संंशयिताविरोधात पोलिसांनी भादंसंच्या ३१७, ३३६ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. संशयित मूळ महाराष्ट्रातील चंदगड येथील आहे.

दोन वर्षापुर्वी तिचा रिचर्डशी विवाह झाला होता. बोर्डा येथे त्या रहात होत्या. तिचा पती रिचर्ड हा सेल्समन आहे. ज्या वेळी तिने त्या तान्हुलीला घराच्या मागे सोडून दिले होते त्यावेळी तो झोपलेला होता. शेजारऱ्यांना ते अर्भक दिसल्यानंतर त्यांनी त्वरीत यासंबधी फातोर्डा पोलिसांशी संपर्क साधून ही घटना सांगितली. नंतर फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व तपासकामाला सुरुवात केली. संशयित व तिच्या पतीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेउन तपासकामाला सुरुवात केली. यावेळी संशयिताने आपल्या हातून झालेल्या कृत्याची कबुली दिल्यानंतर तिला मागाहून अटक केली.

पोलिस निरीक्षक आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रियांका नाईक, अमिन नाईक अतिकेश खेडेकर व पिंक फॉर्सच्या महिला पोलिसांनी तपासकामात भाग घेतला.
 

Web Title: The infant was left wrapped in a plastic bag. Ruthless mother arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.