पगारवाढीसाठी ग्रंथपालांनी घेतली शिक्षण संचालकांची भेट, महिन्याला मिळतात फक्त १४ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:40 PM2023-11-06T16:40:18+5:302023-11-06T16:40:28+5:30
ग्रंथपाल हे या समाजातील एक महत्वाचा घटक आहेत. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देतात. उच्च सुशिक्षित कामगार आहेते. पण सरकारकडून दिला जाणारा तुटपूंजा पगार आम्हाला संसार करण्यासाठी पुरवत नाही मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी, असे या ग्रंथपालांनी सांगितले.
नारायण गावस -
पणजी: राज्यात विविध सरकारी अनुदानीत शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या ग्रंथपालांनी पर्वरी येथील शिक्षण खात्याचे संचालक शैलेद्र झिंगडे यांची भेट घेतली. वेळेत पगार मिळत नाही, पगार तुटपूंजा मिळतो तसेच सवेत कायम केले जात नाही अशा अनेक समस्या त्यांनी संचालकांसमाेर मांडल्या. तुम्हाला सेवेत कायम करायचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे आहे असे सांगून त्यांनी यावर जास्त बाेलणे टाळले राज्यातील विविध शाळांमध्ये सुमार १२० कंत्राटी ग्रंथपाल गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांना प्रती महिना फक्त १४ हजार रुपये पगार दिला जातो. तर वर्षातील २ महिन्यांचा पगार काम नसल्यानेमिळत नाही. त्याचप्रमाणे त्यांना वेळेत पगारही दिला जात नाही. शिक्षण संचालकांनी त्याच्या पगाराविषयी विचारले असता शाळा व्यावस्थपनाकडून उशीर केला जाताे असे सांगण्यात आले. या विषयी ग्रंथपालांनी जून २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. पण आता अडीच वर्षे उलटली अजून काहीच झाले नाही असे, समाज कार्यकर्ते रामा काणकाेणकर यांनी सांगितले.
त्रास कराल तर धरणे धरणार
या ग्रंथपालांची शाळा व्यावस्थापनाकडून सतावणूक झाली तर शाळेत येऊन धरणे धरली जाणार आहे. या शाळा व्यावस्थापनांकडून या कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही फक्त १४ हजार पगार दिला जातो. राजकारणी स्वत: आपला ापगार वाढवून घेतात तर या युवकांना तुटपूंजा पगार दिला जातो. या कागमारांना आम्ही ीन्याय मिळवून देणार, असे शंकर पोळजी यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी
ग्रंथपाल हे या समाजातील एक महत्वाचा घटक आहेत. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देतात. उच्च सुशिक्षित कामगार आहेते. पण सरकारकडून दिला जाणारा तुटपूंजा पगार आम्हाला संसार करण्यासाठी पुरवत नाही मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी, असे या ग्रंथपालांनी सांगितले.