तापमानाचा पारा पुन्हा वाढला, हवामान खात्याकडून ५ जूनपर्यंत पावसाचीही शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 02:24 PM2024-06-02T14:24:44+5:302024-06-02T14:26:56+5:30
राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे. शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे.
नारायण गावस
पणजी: राज्यात बुधवार ५ जून पर्यंत हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला असला तरी राज्यातील सध्या तापमानात प्रचंड वाढले आहे. तापमान सध्या ३५ अंशावर पोहचले आहेे. तर दुसऱ्या बाजूने दमट वातावरणामुळे लोकांना त्रासही होत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणा लोकांना थंडीचा गारवा मिळाला होता आता पुन्हा उष्णतेचा त्रास होत आहे.
राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे. शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्या राज्यामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटक तसेच तामिळनाडूतील काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
गोव्यात अजून मान्सून पाऊस कधी दाखल होणार याचा अंदाज हवामान खात्याने दिला नसला तरी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता मात्रा वर्तविली आहे. या दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केेले आहे. गेल्या आठवड्यात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झाेडपले होते. यामुळे लाेकांना माेठा त्रास झाला होता.
तापमानात वाढ
रविवारी राज्यात तापमान ३५ अंशावर गेले होते. दिवसभर राज्यभरात वातावरण दमट आणि उष्ण होते आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात तापमानात प्रचंड वाढ होत या उष्णतेचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. यामुळे लोकही मान्सनपूर्व पावसाची आतुरतेने वाटत पाहत आहेत.