गोव्याच्या नगर विकास खात्याला जीआयएस मॅपिंगसाठी नागपूरची कंपनी सहकार्य करणार
By किशोर कुबल | Published: March 21, 2023 02:29 PM2023-03-21T14:29:08+5:302023-03-21T14:30:15+5:30
नगर विकास मंडळाच्या बैठकीनंतर राणे बोलतान मंत्री विश्वजित राणेंनी दिली माहिती.
किशोर कुबल
पणजी : शहरी स्थानिक संस्थांअंतर्गत असलेल्या क्षेत्रांच्या जीआयएस मॅपिंगसाठी नागपूरस्थित कोल्ब्रो ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड संपूर्ण नगर विकास खात्याला सहकार्य करणार आहे.
नगर विकास मंडळाच्या बैठकीनंतर राणे बोलतान मंत्री विश्वजित राणे म्हणाले कि, ‘जीआयएस मॅपिंग आम्हाला करांची गणना करण्यासाठी, आमच्या मालमत्तेचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापन ॲपच्या बाबतीत मदत करील.’
ते पुढे म्हणाले की, “सर्व प्रकल्पांचा पूर्ण वापर झाला आहे, याची खात्री करण्यासाठी बांधकाम करण्यापूर्वी सर्वसमावेशक तपासणी आणि स्क्रीनिंग केले जाईल. तसेच आम्ही विविध ठिकाणी उद्याने आणि हिरवीगार जागा तयार करून विविध मोकळ्या जागांचा वापर करण्यावर भर देणार आहोत.’