मिझोरामचे नवे मुख्यमंत्री होते गोव्यात आयपीएस अधिकारी
By पूजा प्रभूगावकर | Published: December 5, 2023 12:29 PM2023-12-05T12:29:46+5:302023-12-05T12:30:35+5:30
Mizoram Assembly Election 2023: मिझोरमचे नवे मुख्यमंत्री लाल दुहोमा हे गोव्यात आयपीएस पोलिस अधिकारी होते. गोवा ,दमन व दीव हे केंद्रशासित प्रदेश असताना १९७७- ७८ या वर्षी ते गोव्यात कार्यरत होते.
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - मिझोरमचे नवे मुख्यमंत्री लाल दुहोमा हे गोव्यात आयपीएस पोलिस अधिकारी होते. गोवा ,दमन व दीव हे केंद्रशासित प्रदेश असताना १९७७- ७८ या वर्षी ते गोव्यात कार्यरत होते.
तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या कार्यकाळात दुहोमा यांच्याकडे गोव्यातील कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यात महत्वाची कामगिरीची बजावली. ड्रग माफिया तसेच सोन्याच्या तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना तत्कालीन सरकारने मुक्त हात दिले होते.
गोव्यात यपीएस अधिकारी म्हणून सेवा बजावणारे दुहोमा मिझोरमचे नवे मुख्यमंत्री बनल्याने ही अभिमानास्पद बाब आहे.त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गोव्याचे विद्यमान तथा मिझेारमचे माजी राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली लाल दुहोमा यांची मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करावा असे मत वैज्ञानिक नंदकुमार कामत यांनी व्यक्त केले.