नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई
By वासुदेव.पागी | Published: May 22, 2024 04:59 PM2024-05-22T16:59:34+5:302024-05-22T16:59:55+5:30
भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
पणजीः गुन्हेगारी संबंधी जुनी कायदा संहिता रद्द करून नवीन संहिता लागू केल्यामुळे देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करणे सुलभ होईल असा विश्वास गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बिश्नोई बोलत होते. ते म्हणाले की गुन्हेगारीचा जुना कायदा मोडीत काढून नवीन कायदा लागू केल्याने अनेक महत्तवाकांक्षी बदल अपेक्षित आहेत. गुन्हे प्रकरणे धसास लागण्याचे प्रमाणही वाढेल आणि गुन्हेगारी सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढेल. कारण गुन्हेगारी सिद्ध होण्यासाठी येणाऱ्या अनेक तांत्रिक अडथळ्यांचा विचारही नवीन कायद्यात करण्यात आला आहे. सुधारीत कायदा हा तपास कामाला अधिक गती देणारा आणि तपास कामात पारदर्शकता आणणारा आहे असे त्यांनी सांगितले.
विशेष करून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना देण्यात आलेली मान्यता हे नवीन कायद्याचे वैशिष्ठ्य आहे. तपास कामेही त्यामुळे लांबणीवर पडणार नाहीत. नागरिक ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीवर तीन दिवसात कारवाई करणे पोलीसांना सक्तीचे असणार आहे. देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्यांचे त्रांकडे मडणारी हा नवीन कायदा आहे. कारण अशा लोकांविरुद्ध कारवाई कऱण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडथळे निकालात काढण्यात आले आहेत. तसेच संबंधित संशयितांनी ताब्यात देण्या संबंधीचा करार अनेक देशांशी करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचे अधिक्षक आयपीएस अधिकारी अक्षत कौशल आणि दक्षिण गोव्याचे अधीक्षक आयपीएस अधिकारी राहुल गुप्ता यांनी अनुक्रमे भारतीय नाय्य संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांची माहिती पत्रकारांना यावेळी दिली.