राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहचली ४८,६९७ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 05:49 PM2023-07-26T17:49:42+5:302023-07-26T17:50:17+5:30
शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.
नारायण गावस
पणजी : कृषी खात्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना या कृषी कार्डधारकांना दिल्या जात असल्याने राज्यात माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी कार्डची नाेंदणी केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ हजार ६९७ शेतकऱ्यांनी कृषी कार्ड नोंद केली आहेत, अशी माहिती अधिवेशनात कृषिमंत्री रवी नाईक यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार वेंझी व्हिऐगास यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.
पूर्वी कृषी कार्ड नसल्याने कुणीही या योजनांना लाभ घेत होते. तसेच एखादी याेजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कागदपत्रे खात्याला द्यावी लागत होते. आता ओळखपत्र म्हणून कृषी कार्ड लावले तर शेतकरी कृषी खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे कृषी कार्डची संख्या वाढत आहे.
गोव्यात प्रत्येकजण सरकारी नाेकरीच्या मागे लागत असल्याने आता सरकार कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी शेतकऱ्यांना ९० टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी स्वावलंबी व्हावे त्यांना कुठलाच त्रास होऊ नये यासाठी या योजना आहे. तसेच आता शेतकरी आपल्या योजनाेसाठी कृषी कार्यालयात वेळोवेळी येणे गरजेचे नाही. एकदा कृषी कार्ड मिळाल्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. सर्वात जास्त कृषी कार्डधारक हे बार्देश तालुक्यात आहेत.
राज्यातील कृषी कार्डधारकांची संख्या
तालुका - कार्डधारक
बार्देश -७०४८
डिचाली -४२६६
काणकोण - ३९८४
धारबांदोडा - १५६५
मुरगाव - ९२८
पेडणे - ६०९२
फोंडा - ४१३४
केपे - ३९०१
सासष्टी - ६५२३
सांगे - २९५१
सत्तरी - ५०१३
तिसवाडी - २२९३
एकूण - ४८६९७