देशातील श्रीमंतांच्या यादीत गोव्यातील एकमेव; उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांच्याकडे १८०० कोटींची संपत्ती
By किशोर कुबल | Published: October 27, 2023 03:15 PM2023-10-27T15:15:35+5:302023-10-27T15:15:59+5:30
धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची १८०० कोटींची संपत्ती असून धनाढ्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक ८४० वा आहे.
पणजी : देशातील श्रीमंतांच्या यादीत गोव्यातील एकमेव उद्योगपतीने स्थान मिळवले आहे. धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची १८०० कोटींची संपत्ती असून धनाढ्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक ८४० वा आहे.
श्रीनिवास धेंपो यांनी ‘३६० वन हेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट' मध्ये स्थान मिळवले आहे. धेंपो उद्योग समुहाचे एकेकाळी गोव्यात खाण व्यवसायावर साम्राज्य होते. धेंपो यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी खाणी विकल्या. गोवा कार्बन लिमिटेड आणि हिंदुस्तान फूड्सचे प्रवर्तक असून इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत. देवश्री या नावाने रिअल इस्टेट कंपनी ते चालवत आहेत. धेंपो यांच्या गोव्याबाहेर छत्तीसगढ वगैरे ठिकाणी खाणी आहेत.
मुकेश अंबांनी सर्वात जास्त श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती
२०१९ मध्ये ३ लाख कोटी रुपयांवरून २०२३ मध्ये ८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, अदानी यांच्या संपत्तीत ६.१९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी वार्षिक संपत्तीतील घट आहे. १३१९ लोकांकडे आता १००० कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे.