उष्णतेचा पारा चढल्याने फळांचे भाव वाढले, ज्युस सेंटरमध्ये किमती वाढविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 02:30 PM2024-03-17T14:30:55+5:302024-03-17T14:59:45+5:30
राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेचा बचाव करण्यासाठी लोकांनी फळांच्या आहारात वाढ केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगण, द्राक्षे, संत्रे, शहाळे, काेकम सरबत, लिंबू पानी तसेच अन्य विविध फळांच्या रसाला मागणी वाढली आहे.
नारायण गावस
पणजी: राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेचा बचाव करण्यासाठी लोकांनी फळांच्या आहारात वाढ केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगण, द्राक्षे, संत्रे, शहाळे, काेकम सरबत, लिंबू पानी तसेच अन्य विविध फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. लाेकांना आता आरोग्याची काळजी सतावत असल्याने थंड पेय कमी केल्याने फळांचा रसाला मागणी वाढली आहे. त्यामुळे या उष्णतेच्या बचावासाठी बाजारात फळे विक्रेत्यांनी तसेच ज्युस सेंटरमध्ये याच्या किमती काही प्रमाणात वाढविल्या आहेत.
राज्यात सध्या दुपारचा उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत जात असतो. त्यामुळे दुपारी ११ ते सांय ४ पर्यंत बाहेर फिरणे कठीण झाले आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लाेकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. आता हिवाळी हंगाम कमी झाला असून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी काही थंडी असते. पण शहरात दिवसरात्री उष्णतेचा पारा वाढलेला असतो.
राज्यात मागील काही वर्षांपासून उष्णतेचा पारा वाढत आहे. यंदा हिवाळी हंगाम नोव्हेंबर डिसेंबर फक़्त दोनच महिने काही प्रमाणात मिळाला. तर जानेवारीपासून पुन्हा उष्णतेचा पारा चढायला सुरवात झाली. या वाढत्या उष्णतेमुळे लोक आता आरोग्यदायी आहारावर भर देत असल्याने असे अशी पौष्टिक आहार मागणी वाढली आहे. आता आणखी पुढील दाेन महिने ही असाहाय्य उष्णता सहन करावी लागणार आहे.
फळांच्या किंमतीत वाढ
वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या किमंती मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. कलिंगड ३० रुपये प्रती किलाेने विकले जात आहे. संत्री १५० रुपये प्रती किलाे, द्राक्षे १०० रुपये प्रती किलाे, लिंबू १० रुपयाला एक असा आहे. तर शहाळे ६० रुपये एक अशी विकली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे या फळांची मागणी वाढली आहे.