मालमत्तेच्या वादारुन काकीचा भोसकून खून; अन्य एक जखमी, संशयिताला अटक

By सूरज.नाईकपवार | Published: January 8, 2024 03:30 PM2024-01-08T15:30:51+5:302024-01-08T15:31:11+5:30

गोव्यातील पाद्रीभाट नेसाय येथे खूनाची घटना

The stabbing of an aunt over a property dispute; Another injured, suspect arrested | मालमत्तेच्या वादारुन काकीचा भोसकून खून; अन्य एक जखमी, संशयिताला अटक

मालमत्तेच्या वादारुन काकीचा भोसकून खून; अन्य एक जखमी, संशयिताला अटक

मडगाव: मालमत्तेच्या वादावरुन भांडण होउन आपल्या सख्या काकीचा खून करण्याची खळबळजनक घटना रविवारी उशिरा रात्री गोव्यातील सासष्टी तालुक्यातील पाद्रीभाट नेसाय सां जुझे दि आरियाल येथे घडली. फुलरातिना फर्नांडीस (५३) असे मयताचे नाव आहे. या खून प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी लागलीच तपास करुन संशयित मारियो ओलिवर (३४) याला ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली.

दरम्यान खुनाच्या घटनेच्या वेळी मयताचा शेजारी जुबेन ओलिवेरा (२०) हा ही जखमी झाला. सदया त्याच्यावर येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भादंसं च्या ३०२ व ३२४ कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केल्याची माहिती मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.

रविवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान खुनाची वरील घटना घडली. मयत व संशयित यांच्यात मालमत्तेवरुन वाद होता. तसेच किरोकळ बाबीवरुनही त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. रविवारी रात्रीही उभयंतामध्ये वाद झाला. यावेळी संशयित मारियोने चाकूने फ्लोरिनाच्या पोटावर , छातीवर व पायावर सपासप वार केले. यात रक्तस्त्राव होउन ती घटनास्थळीच निपचित पडली. नंतर तिला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

खुनाच्या घटनेनंतर संशयित मारियो याने घटनास्थळाहून काळया रंगाच्या आल्टो कारमधून धूम ठोकली. नंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. संशयिताची सदया कसून चौकशी चालू आहे, खुनासाठी वापरलेला चाकू अजूनही सापडला नसून, पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.

Web Title: The stabbing of an aunt over a property dispute; Another injured, suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.