राज्यातील तापमान २ अंशानी घटले, पुढील आठवडा तापमान स्थिर राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 03:38 PM2024-05-04T15:38:14+5:302024-05-04T15:38:56+5:30
या आठवड्यात तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सियस राहणार अशी शक्यता हवामान खात्याने शनिवारी वर्तविली आहे.
नारायण गावस
पणजी : या आठवड्यात तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सियस राहणार अशी शक्यता हवामान खात्याने शनिवारी वर्तविली आहे. मागच्या आठवड्यात हे तापमान ३५ ते ३५.५ अंश सेल्सियस पर्यंत गेले हाेते. पण पुढील आठ दिवस तापमान काही प्रमाणात कमी राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने कमी असणार आहे.
शनिवारी हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, पणजी येथे कमाल ३३.६ अंश तर किमान २४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुरगावात कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस झाले होते. मुरगावातील किमान तापमान २४.८ अंश नोंद करण्यात आली. पुढील सात दिवस हे तापमान ३३ ते ३४ अंश पर्यंत राहणार असल्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता मंगळवारी निवडणुका असल्याने लाेकांना निवणुकीत माेठ्या प्रमाणात बाहेर पडावे लागणार आहे. यात ज्येष्ठ मतदारांना फटका बसू शकतो पण कही प्रमाणात तापमान कमी असल्याने याचा फायदा होणार. तरीही हवामान खात्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. काही वेळा ते ३५.५ अंश पर्यंत गेले हाेते. या तापमानापासून बचाव करण्यासाठी आरोग्य खाते हवामान खात्याने काही सूचनाही नागरिकांना जारी केल्या आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सारखे आजार जडले आहेत.