‘ट्रीपल सीट’ जाणारी दुचाकी बसखाली आली, दोघांचा दुर्देवी अंत
By पंकज शेट्ये | Published: April 30, 2023 11:11 PM2023-04-30T23:11:01+5:302023-04-30T23:11:49+5:30
‘ट्रीपल सीट’ जाताना पोलीस दिसल्याने पळण्याच्या प्रयत्नात असताना घडला अपघात
वास्को: रविवारी (दि.३०) दक्षिण गोव्यातील वास्को शहराच्या अंतर्गत रस्त्यावरून खारीवाडा जाणाºया रस्त्यावर दुचाकी आणि कदंब बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून ‘ट्रीपल सीट’ प्रवास करणाºया दोन तरुणांचा दुर्देवी अंत झाला तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. कदंब बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आल्याने मरण पोचलेल्या त्या दुचाकी चालकाचे नाव प्रकाश बिंद (वय ३०) असून त्याच्यामागे बसलेला अरुणकुमार सरोज (वय २१) याचा मृत्यू झाला आहे. त्याच दुचाकीवरून प्रवास करणारा रतीशकुमार सरोज (वय २९) अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे.
दुचाकीवरून तिघेहीजण ‘ट्रीपल सीट’ जाताना त्यांची नजर तेथे असलेल्या पोलीसांवर पडल्याने ते तेथून पळण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावर पडून तेथून जाणाºया कदंब बसच्या मागच्या चाकाखाली आली अशी माहीती घटना पाहीलेल्या काहींनी दिली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास तो भीषण अपघात घडला. बिर्ला, झुआरीनगर येथे राहणारा प्रकाश बिंद हा दुचाकीच्या मागे अरुणकुमार सरोज आणि रतीशकुमार सरोज यांना बसवून वास्कोत घेऊन आला होता. बिर्ला, झुआरीनगर येथे राहणारे तिघेहीजण वास्कोत दुचाकीवर अयोग्य पद्धतीने ‘ट्रीपल सीट’ आल्यानंतर ते शहरात दुचाकीवरून फीरत होते. ज्यावेळी ते खारीवाडा जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर ‘ट्रीपल सीट’ पोहोचले त्यावेळी दुचाकी चालक प्रकाश बिंद याची नजर तेथे असलेल्या पोलीसांवर पडली.
‘ट्रीपल सीट’ असल्याने पोलीस त्यांना पकडू शकतील अशी कदाचित भिती प्रकाश याला निर्माण झाल्याने त्यांने तेथून पळ काढण्यासाठी दुचाकीची गती वाढवली. त्याचवेळी मडगावहून वास्कोला आलेली कदंब बस वळण घेऊन खारीवाडा बसस्थानकावर जात होती. घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी दुचाकीची गती वाढवल्यानंतर प्रकाश याचा अचानक दुचाकीवरून ताबा सुटून दुचाकी रस्त्यावर पडून तेथून जाणाºया कदंब बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आली. कदंब बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी येऊन घडलेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक प्रकाश बिंद जागीच ठार झाला अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली. त्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या अरुणकुमार आणि रतीशकुमार यांना उपचारासाठी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच अरुणकुमार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी पोलीसांनी दिली.
दरम्यान त्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रतीशकुमार याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याची माहीती पोलीसांनी दिली. दुचाकीवरून ‘ट्रीपल सीट’ प्रवास करणारे ते तिघेहीजण मूळ उत्तरप्रदेश येथील असून काही काळापासून ते बिर्ला, झुआरीनगर भागात रहायचे अशी माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीसांनी रविवारी संध्याकाळी दुचाकी आणि कदंब बस यांच्यात झालेल्या भीषण अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे.