देशातील तरुण शक्तीही पूर्ण पणे मोदीजींच्या पाठीशी; मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:21 PM2024-03-04T14:21:30+5:302024-03-04T14:23:13+5:30
वैभवशाली भारताचे स्वप्न पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात भारताला विश्व गुरुच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवीन प्रेरणा दिलेली असून आजची नवी पिढी पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या सोबत आहे .
डिचोली/ विशांत वझे
वैभवशाली भारताचे स्वप्न पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात भारताला विश्व गुरुच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवीन प्रेरणा दिलेली असून आजची नवी पिढी पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या सोबत आहे . विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदींच्या स्वप्नांना चालना देण्यासाठी नवयुवकांनी नवनवीन कल्पना सुचवाव्यात व भारत अधिक भक्कम बलशाली सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले, रन फॉर मोदी अंतर्गत देश व राज्य पातळीवर पंतप्रधानांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठी युवाशक्तीची विशेष रॅली साखळी मतदारसंघात काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते .
देशाला पायाभूत विकास ,मानवी विकास ,व इतर माध्यमातून मोठे यश उपलब्ध करून देताना मोदीजींनी युवा युवतींचा रोल व त्यांची भविष्यातील दृष्टी खूप महत्त्वाची असून नवभारत विकसित करण्यासाठी त्यांनी युवाशक्तीच्या समोर अनेक स्वप्न पाहिलेले असून क्लीन इंडिया ते फिट इंडिया तसेच विविध माध्यमातून विकसित भारतासाठी त्यांची संकल्पना खूप मोठी आहे .
ती साकार करण्यासाठी नवयुवकांची देशाची सारी शक्ती खंबीरपणे पंतप्रधान मोदींच्या सोबत असल्याने खऱ्या अर्थाने भारत जागतिक पातळीवर विश्वगुरू बनण्याच्या पवित्र्यात असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले. युवकांनी दूरदृष्टी ठेवून आगामी भारत कसा असावा यासाठीचे आपले विविध संकल्प सूचना सादर कराव्यात असे आवाहनही डॉक्टर सावंत यांनी यावेळी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष गोपाळ सु र्लकर तर नगराध्यक्ष रश्मी देसाई कालिदास गावससंतोष मलिक, राजन फाळकर, कृष्णा गावस आनंद काणेकर नगरसेवक विविध पंचायतीचे सरपंच पंच भाजप पदाधिकारी विद्यार्थी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
साखळी येथील हॉस्पिटल जवळ सुरू झालेल्या या रॅलीमध्ये पंतप्रधानांच्या अभिनंदनच्या घोषणा देण्यात आल्या . संपूर्ण साखळी परिसरातून ही रॅली काढण्यात आली.