दोन लाखांच्या टॉवर बॅटऱ्यांची चोरी; म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल
By काशिराम म्हांबरे | Published: November 9, 2023 05:12 PM2023-11-09T17:12:46+5:302023-11-09T17:12:53+5:30
म्हापसातील गृहनिर्माण वसाहतीमधील मोबाईल टॉवरच्या २४ एक्साईड बॅटरी चोरण्याचा प्रकार म्हापशात घडला.
काशिराम म्हांबरे
म्हापसा: म्हापसातील गृहनिर्माण वसाहतीमधील मोबाईल टॉवरच्या २४ एक्साईड बॅटरी चोरण्याचा प्रकार म्हापशात घडला. या सर्व बॅटरींची किंमत २.१८ लाख रुपये आहे. ही चोरीची घटना गेल्या दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती. याबाबत दि. ८ नोव्हेंबर रोजी वार्का येथील मेसर्स रॅडिएन्ट फॅसिलिटीस कंपनीचे फिल्ड अधिकारी दिलीप सिंग यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली.
फिर्यादींच्या कंपनीने म्हापसा गृहनिर्माण वसाहतीमध्ये मोबाईल टॉवर उभारला आहे. या टॉवरसाठी कंपनीने २४ एक्साईड बॅटºया आणून टॉवरस्थळी ठेवल्या होत्या. या बॅटºया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
या २४ बॅटर्यांची किंमत २ लाख १८ हजार २१४ रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी भा.दं.सं.च्या ३७९ कलमांतर्गत अज्ञात चोरट्यां विरूद्ध गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विराज कोरगावकर हे करताहेत.