...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2024 08:56 AM2024-06-01T08:56:35+5:302024-06-01T08:56:52+5:30

खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

then complain to election commission said manoj parab | ...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्ष हा राजकीय पक्ष नसून तो एनजीओ असल्याचा आरोप वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. जर त्यांच्या आरोपात दम असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे आरजी विरोधात तक्रार करावी, असे खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

आरजीने लढवलेली विधानसभा निवडणूक ही असंविधानिक होती. आमचे निवडून आलेले एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात त्यांनी सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल करुन दाखवावी, असे परब म्हणाले. 

परब म्हणाले, की ढवळीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळेच ते वारंवार आरजीवर आरोप करतात. आरजी ने जर तसे खरेच केले असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. आमदार बोरकर हे बेकायदेशीरपणे निवडून आल्याचे त्यांनी सिद्ध करावे.

त्यांच्या पक्षाची नेमकी ताकद काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी त्यांना कळून येईल' असा टोला ढवळीकर यांनी लगावला. ते म्हणाले की, 'लोकांनी त्यांना झिडकारलेले आहे. खुद्द मडकई मतदारसंघात त्यांना जी काही मते मिळणार आहेत, त्यावरून त्यांनी आत्मचिंतन करावे व नंतरच चांगले काम करत असलेल्या लोकांवर टीका करण्याचे धाडस करावे.'

 

Web Title: then complain to election commission said manoj parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.