संपूर्ण गोव्यात 24 तास अंखडीत वीजपुरवठा होईपर्यंत वीज दरवाढ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 09:38 PM2018-10-27T21:38:39+5:302018-10-27T21:38:58+5:30
दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री क्राबाल हे उपस्थित होते . या कार्यक्रमांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
मडगाव : संपूर्ण गोव्यात चोवीस तास वीजपुरवठा होईपर्यंत वीजदरवाढ केली जाणार नाही. अशी ग्वाही गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी शनिवारी सायंकाळी दिली. दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री क्राबाल हे उपस्थित होते . या कार्यक्रमांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
वीज नियमन प्राधिकरणाने जरी वीजदरवाठ केली तरी ती सरकार लोकांवर लादणार नाही तर सरकार ती सोसेल त्यामुळे लोकांना या दरवाढीची झळ बसणार नाही. ते म्हणाले की आपण मंत्रीपद स्वीकारल्यास महिना होत आला आहे. त्यावेळी आपण पंचेचाळीस दिवसात एकंदर वीजस्थितीवर श्र्वेतपत्रिका जारी करू असे आश्र्वासन दिले होते. पण नंतर केलेल्या अभ्यासात खात्यात जागोजागी बजबजपुरी माजलेली आहे व ती गेल्या दहा वर्षापासूनची असल्याने ही श्र्वेतपत्रिका जारी करण्यास आणखी पंधरा दिवस लागतील.
मडगावांत 7 कोटी खर्चून घातलेली भूवीज केबल कार्यान्वितच झालेली नाही. ती कुठे घातली होती त्याचा देखील पत्ता नव्हता आताच कुठे तो लागलेला असून त्या पुढील पावले उचललेली आहेत. पर्वीत नव्या सचिवालयासाठी घातलेली अशीच भूवीज केबल कार्यान्वित न होता पडून होती व ती कार्यान्वीत करण्याचे काम सुरु केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
खात्यांत अधिक्षक अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. दोन सहाय्यक मुख्य अभियंत्यांची पदे अशीच रिक्त आहेत व त्यामागील कारण पात्र उमेदवार नाहीत ही आहेत. जे आहेत त्यांना तांत्रिक कारणास्तव पढती देता येत नाहीत. येत्या 31 ऑकेटोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यासाठीच्या नियमात बदल करून ती पदे भरली जातील, ते म्हणाले. गोव्यात वीज निर्मिती होत नाही व म्हणून सेंट्रल ग्रीडकडून ती घेण्यासाठी तसेच उच्च दाबाच्या वाहिन्या टाकण्यासाठी अधिक मनोरे उभारण्याची गरज आहे त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले व त्यासाठी जमीन संपादन केली जाणार नाही, तिची मालकी लोकांकडेच राहिल पण तिचा योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. वीजपुरवठय़ासंदर्भातील पायाभूत सुविधा पीपीपी तत्वावर उभारण्याचा संकेतही काब्राल यांनी दिला.