शेतक-यांच्या डोळ्यात आता पाणीही दिसणार नाही, ते पूर्णपणे आटलेले आहे - नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 09:45 PM2017-11-22T21:45:35+5:302017-11-22T21:45:52+5:30

महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख दिसून येत नाही. त्यांच्या डोळ्य़ात अजिबात पाणी दिसणार नाही, त्यामुळे आता शेतक-यांच्या दु:खाची व्याख्या बदलली आहे असे आपल्याला वाटते, असे मत नाना पाटेकर यांनी बायोस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर मंगळवारी रात्री रंगलेल्या गप्पात व्यक्त केले. सचिन चाटे यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

There is no water in the eyes of the farmers, it is completely empty - Nana Patekar | शेतक-यांच्या डोळ्यात आता पाणीही दिसणार नाही, ते पूर्णपणे आटलेले आहे - नाना पाटेकर

शेतक-यांच्या डोळ्यात आता पाणीही दिसणार नाही, ते पूर्णपणे आटलेले आहे - नाना पाटेकर

googlenewsNext

पणजी : महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख दिसून येत नाही. त्यांच्या डोळ्य़ात अजिबात पाणी दिसणार नाही, त्यामुळे आता शेतक-यांच्या दु:खाची व्याख्या बदलली आहे असे आपल्याला वाटते, असे मत नाना पाटेकर यांनी बायोस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर मंगळवारी रात्री रंगलेल्या गप्पात व्यक्त केले. सचिन चाटे यांनी त्यांची मुलाखत घेतली. 
नाना म्हणाले की, तुम्हाला गावातील लोकांची सुख-दु:ख वेगळी असल्याचे दिसेल, त्यासाठी शहरातून गावात गेले पाहिजे. तेथील शेतक-यांच्या डोळ्यात आता पाणीही दिसणार नाही, ते पूर्णपणे आटलेले आहे. नाम फाऊंडेशनचा उद्देश समाजासाठी काहीतरी करण्याचा आहे. आपण भाजपचा प्रचार करीत नाही, पण केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकार शेतक-यांसाठी काहीतरी करतेय, त्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 
आपल्या चित्रपट दिग्दर्शनाविषयी ते म्हणाले की, प्रहार या चित्रपटानंतर त्या क्षेत्रकडे वळलो नाही. पण आता त्यावर काम सुरू आहे, याबाबत आपण अधिक बोलू शकत नाही. गंभीर भूमिकांकडून वेलकममधील विनोदी भूमिकेकडे कसे वळलात, या प्रश्नावर ते म्हणाले की, या चित्रपटात स्वत:ला तोलण्याचा मी प्रयत्न केला. पण या चित्रपटात कॉमेडी करण्यासारखे काहीच नाही. सिक्वेन्सच अशा होत्या की त्या विनोदी वाटतात. 

बसथांब्यासारखे विसरून जायचे
उपस्थितांमधून डॉयलॉग म्हणण्याची विनवणी करण्यात आल्यानंतर नानांनी अत्यंत मार्मिक आणि सोप्या भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले की, सध्या मी व्यवसायिक झालो आहे. आता बोलायलाही पैसे घेतो. त्यामुळे डॉयलॉग म्हणायलाही पैसे पडतील, असे सांगताच हश्शा पिकल्या. त्याचबरोबर प्रवासाला निघाल्यावर एखादा थांबा आला तर कोणते आहे, ते पहाचे आणि पुढे निघून जायचे. मागचे काही आठवायचे नाही. असेच चित्रपटाचे आहे. 

पुरस्कारांनी पोट भरत नाही!
प्रहार, परिंदा आणि क्रांतिवीर चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराचा आठवण करून दिल्यानंतर त्यावर नाना म्हणाले की, पुरस्काराने पोट भरत नाही. आई पूर्वी हातावर बत्ताशा ठेवायची, त्यामुळे पुरस्कार हे बत्ताशाप्रमाणो असतात. खायाला तेवढय़ापुरता तो बत्ताशा गोड लागतो. तसाच प्रकार पुरस्कारांचा आहे. ज्या चित्रपटाला अधिक पुरस्कार मिळतात, तो चित्रपट कोणीच पाहीत नाही, असे आपणास वाटते. शिवाय रस्त्यावरील माणूसही चित्रपट पाहून खूष होतो, त्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे असे लोकांना भावणारे आणि आनंद देणारे चित्रपट महत्त्वाचे वाटतात. पूर्वी गोविंद निहलानी, श्याम बेनेगल यांचे चित्रपट त्या धाटणीचे होते, त्यामुळे ते लोकांना लगेच भावत होते, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, संजयलिला भन्साळी यांनी इतिहासावर आधारीत पद्मावती, बाजीराव मस्तानी चित्रपट काढला आपल्याला ते अजिबात पटले नाही. वादाचे कारण बनण्याचे टाळणो कधीही चांगले. नाक कापणो, कोणास मारण्याचा हक्क त्यांना आहे का? जे दुस:याला जीवन देऊ शकत नाहीत, त्यांना मारण्याचा काय अधिकार असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर कलाकारांनी कधीही साधेपणाने वागणो अपेक्षित आहे. दहा-बारा अंगरक्षक घेऊन जाणो आपल्याला पटत नाही. कॅमेरापुढे बाजूला गेलो की, साधे जगणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी उदयोन्मुख कलाकारांना दिला. 

टाळ्या कधी वाजावयाच्या!
कट्टे यांच्या एका कोटीवर रसिकांना किंवा श्रोत्यांना टाळ्या वाजवायाला कधी सांगायचे नाही, असे आपणास वाटते कारण त्यांना तेवढे ज्ञान असते की टाळ्या कधी वाजावयाच्या. ज्यावेळी त्यांना एखादी गोष्ट पटती तेव्हा ते टाळ्या वाजवतातच, असे नाना म्हणाले. 

- नाना पाटेकर तसे हजरजबाबी. त्यांच्या बायस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर गप्पा रंगल्यानंतर नाना पाटेकर स्वत: उभारून चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत होते. त्यामुळे वातावरण अगदी उत्साही झाले होते. त्यातच व्यासपीठावर मुलाखत घेणारे सचिन कट्टे यांनी ह्यहा शेवटचा प्रश्नह्ण असे म्हणताच. नानांनी थांबरे..विचारू दे त्यांना..शेवटचा काय म्हणतोस, असे म्हणत कट्टे यांना थांबविले. त्यानंतर नानांनी पुन्हा प्रश्न-उत्तरांना सुरुवात केली. 

- तिरंगा चित्रपटातील आठवण करून देताना नाना म्हणाले, लोकांना हा चित्रपट पूर्ण होणार की नाही, याची शाश्वती नव्हती. दोन माथेफिरू या चित्रपटात होते. राजकुमार हे आपल्या वडिलांसारखे असल्याने, त्यात काही करण्याची गरज नव्हती. त्यांचे पाय धरले आणि सांभाळून घ्या, एवढेच म्हणालो. 
 

Web Title: There is no water in the eyes of the farmers, it is completely empty - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.