राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या खर्चाची न्यायालयीन चौकशी व्हावी; गोवा प्रदेश काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:49 PM2023-11-02T14:49:19+5:302023-11-02T14:49:28+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी हजारो काेटींचा खर्च करुनही दुय्यम दर्जाचे साहित्य वापरण्यात आले.
नारायण गावस
पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी हजारो काेटींचा खर्च करुनही दुय्यम दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षतेचा प्रश्न समाेर येत आहे. या राष्ट्रीय स्पर्धेच्या एकूण खर्चाची तसेच सुरक्षतेचे ऑडिट करावे तसेच याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे सह सचिव कॅप्टन व्हिरिएटो फर्नाडिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत ॲड. श्रीनिवास खलप उपस्थित होते.
स्पर्धेसाठी जे आधुनिक दर्जेचे मंडप सांगून कराेडाे रुपयांचे कंत्राट दिले आहे. पण अनेक ठिकाणी हे मंडपाचे साहित्य कोसळलेले आहे. पडदे आहेत ते दुय्यम दर्जाचे आहेत. नुकत्याच पडलेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने खेळाडूंनाही त्रास झालेला आहे. हा एवढा माेठा खर्च करुन यात कुणालाच योग्य ताे फायदा झालेला नाही. सर्व प्रकारे ही जनतेच्या पैशाची लुट आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे याची चाैकशी मागत आहोत, असे यावेळी कॅप्टन व्हिरिएटो फर्नांडिस यांनी सांगितले.
आमचा राष्ट्रीय स्पर्धांना विरोध नाही पण हा जो पैशांचा चुराडा केला आहे त्याचे स्पष्टीकरण हवे आहे. एवढे पैसे खर्च करुनही याेग्य अशा सुविधा नाही यात काेण काेण गुंतले आहे. कुणाच्या खिशात पैस गेेले याची चौकशी करणे गरजेचे आहे, असेही कॅ. व्हिरिएटो फर्नाडिस यांनी सांगितले.