चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक टार्गेट; हळदोणेच्या आमदारांनी घेतली पोलिस महानिरीक्षकांची भेट
By पूजा प्रभूगावकर | Published: May 21, 2024 12:38 PM2024-05-21T12:38:48+5:302024-05-21T12:40:00+5:30
पोलिसांनी वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: हळदोणे व आजूबाजूच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बंद घरे किंवा जिथे ज्येष्ठ नागरिकच राहतात त्यांनाच चोरटे अधिक टार्गेट करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत असल्याचे म्हणत हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन घेतली.
पणजी येथील पोलिस मुख्यालयात आमदार ॲड. फरेरा यांनी काही नागरिकांसोबत महानिरीक्षक तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांची भेट घेऊन हळदोणे व आजूबाजूच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने तेथील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी वाढत्या चोऱ्यांवर आळा आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणीही केली.
ॲड. फरेरा म्हणाले, की चोरटे चोरी करण्यापूर्वी परिसराची पाहणी करतात. जी घरे बंद असतात किंवा ज्यात ज्येष्ठ नागरिकच राहतात अशाच घरांना ते टार्गेट करीत आहेत. काही चोरी प्रकरणांमध्ये तर आपला चेहरा ओळखता येऊ नये यासाठी ते मास्क घालून येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.