तिसऱ्या मांडवी पुलाचे 12 जानेवारीला उद्घाटन, 91 टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:11 PM2018-11-13T20:11:28+5:302018-11-13T20:11:46+5:30

तिसऱ्या मांडवी पुलाचे येत्यावर्षी 12 जानेवारी रोजी उद्घाटन करावे व त्या दिवसापासूनच तो पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करावा, असे शासकीय स्तरावर ठरले आहे.

The third Mandvi Bridge will be inaugurated on January 12, completed 91 percent work | तिसऱ्या मांडवी पुलाचे 12 जानेवारीला उद्घाटन, 91 टक्के काम पूर्ण

तिसऱ्या मांडवी पुलाचे 12 जानेवारीला उद्घाटन, 91 टक्के काम पूर्ण

Next

पणजी - तिसऱ्या मांडवी पुलाचे येत्यावर्षी 12 जानेवारी रोजी उद्घाटन करावे व त्या दिवसापासूनच तो पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करावा, असे शासकीय स्तरावर ठरले आहे. पुलाचे 91 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे.

मांडवी पुलाचे काम अगोदर मार्च 2क्18 मध्ये पूर्ण करावे असे ठरले होते. तथापि, मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादासमोर पुलाचा विषय पोहचला व तिथे बरेच महिने खटला सुरू राहिल्यानंतर पुलाचे एकाबाजूचे काम सहा महिने तरी रेंगाळले. मार्चनंतर डिसेंबर 2018 मध्ये पुलाचे काम पूर्ण होईल असेही सांगितले जात होते पण पावसाळ्य़ात कामाचा वेग मंदावला. आता दि. 12 जानेवारीला उद्घाटन करावे असे तत्त्वत: ठरले आहे. पर्वरीच्याबाजूने व मेरशीच्याबाजूने बहुतेक काम पूर्ण झाले आहे. तिस-या मांडवी पुलासाठी लार्सन अॅण्ड टुब्रो ही कंत्रटदार कंपनी म्हणून काम पाहत आहे. गोवा व केंद्र सरकारने मिळून या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. आतार्पयत एकूण खर्चापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे, असे सुत्रंनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करावे असे यापूर्वी ठरले होते. दि. 12 जानेवारीला पंतप्रधान उपलब्ध होतील काय ते मात्र स्पष्ट झालेले नाही. पणजीत रात्रीच्यावेळी रोषणाईमुळे हा पुल अधिक आकर्षक दिसेल.

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असलेले माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी मंगळवारी पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत महामंडळाचे सरव्यवस्थापक संदीप चोडणोकर, कंत्रटदार कंपनी असलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्री राज तसेच सल्लागार उत्पल बॅनर्जी हेही यावेळी उपस्थित होते. तिस:या मांडवी पुलावर एक हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ काम करते. रात्रीच्यावेळीही काम सुरू असते. पन्नासपेक्षा जास्त अभियंते मांडवी पुलाच्या ठिकाणी काम करत आहेत, असे कुंकळ्ळ्येकर यांनी कामाची पाहणी केल्यानंतर सांगितले.

Web Title: The third Mandvi Bridge will be inaugurated on January 12, completed 91 percent work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा