तेरावा मांगिरिश संगीत महोत्सव 22 आणि 23 एप्रिल रोजी
By आप्पा बुवा | Published: April 17, 2023 05:56 PM2023-04-17T17:56:48+5:302023-04-17T17:57:17+5:30
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे उद्घाटन होईल.
फोंडा - मंगेशी युथ क्लब मंगेशी आणी कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणारा तेरावा मांगिरेश संगीत महोत्सव यंदा 22 आणि 23 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री मंगेश देवस्थानच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे उद्घाटन होईल.
ख्यातनाम गायक कलाकार पं. भरत बळवल्ली, पं.शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी पाटील, मीनाक्षी पेंढारकर व श्रुती भावे चितळे या महोत्सवात गायन सादर करणार आहेत. राया कोरगावकर,दयानिदेश कोसंबी, अमेय पटवर्धन, सुनाध कोरगावकर, दत्तराज शेटे, राहुल खांडोळकर हे कलाकार सदर गायक कलाकारांना साथ संगत करतील. डॉ.अजय वैद्य व गोविंद भगत हे महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.