थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या

By किशोर कुबल | Published: December 15, 2022 01:34 PM2022-12-15T13:34:39+5:302022-12-15T13:34:57+5:30

अनेक तारांकित हॉटेल्सचे बुकिंग झालेले आहे आणि हरमल, मोरजी आणि आश्वें आदी किनारे तसेच इतर ठिकाणी या पर्यटकांनी खोल्या आरक्षित केल्या आहेत.

Thirty First Celebration! Large number of tourists from Russia, Kazakhstan in Goa | थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या

Next

 

पणजी - गोव्यात पर्यटन हंगाम बहरु लागला असून सध्या रशियाकडून दिवसाला एक आणि कझाकिस्तानकडून आठवड्यातून एक चार्टर विमान पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल होत आहे. नाताळ, नववर्षानिमित्त येत्या २0 नंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियन पर्यटकांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. ‘कॉन्कॉर्ड’चे उपाध्यक्ष शेख इस्माईल म्हणाले की, गोव्यासाठी ही आशादायी स्थिती आहे.  कझाकस्तानमधून आणखी चार्टर येणार आहेत, जरी त्या देशासाठी ई-व्हिसा अद्याप पुनर्संचयित केलेला नाही. ते म्हणाले की, त्यांनी रशियामधून चार्टर आगमनाच्या गुणवत्तेत सुधारणा पाहिली आहे. अनेक तारांकित हॉटेल्सचे बुकिंग झालेले आहे आणि हरमल, मोरजी आणि आश्वें आदी किनारे तसेच इतर ठिकाणी या पर्यटकांनी खोल्या आरक्षित केल्या आहेत.’ कॉन्कॉर्ड ही एजन्सी रशियन चार्टर पर्यटकांचा एक मोठा भाग हाताळते.

गोव्यात दरवर्षी साधारणपणे ८ लाख विदेशी तर ८0 ते ९0 लाख देशी पर्यटक भेट देत असतात. विदेशी पाहुण्यांमध्ये गोव्याला भेट देणाऱ्यांमध्ये रशियन नागरिकांची संख्या जास्त असते त्यापाठोपाठ ब्रिटिश पर्यटकांचा क्रमांक लागतो. कोविडमुळे गेल्या दोन वर्षात पर्यटकसंख्या घटली होती. मात्र आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. एका पर्यटन व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार तुलनेत ब्रिटिश पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि त्याचा गोव्यातील पर्यटन उद्योगांना फायदा होतो. रशियन पर्यटक एक तारांकित किंवा दोन तारांकित अशा छोट्या हॉटेलांमध्ये राहतात. रशियन चार्टर विमानांमधून येणारे पर्यटक हे कारागीर, पेंटर अशा पद्धतीचे लहान व्यवसायिक पैशांची बचत करून फिरायला आलेले असतात. त्यामुळे ते जास्त खर्च करत नाही.

कोविड महामारीपूर्वी गोव्याचा पर्यटन हंगाम बहरला होता. २0१८ साली १ लाख ४८ हजार ब्रिटिश पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांमध्ये ब्रिटीश पर्यटक प्रिय आहेत. ब्रिटिश पर्यटक १४ ते २१ दिवस गोव्यात राहतात. ते एकाच ठिकाणी किंवा एकाच हॉटेलात राहतात. खरा आनंद लुटण्यासाठी येणारे हे पर्यटक रिलॅक्स मूडमध्ये आपली सुट्टी येथे मजेत घालवत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते खर्चही करीत असतात त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना याचा बराच लाभ होत असतो. काहीवेळा त्यांचे वास्तव्य ७ दिवस असते परंतु अन्य देशांच्या पर्यटकांप्रमाणे ते घाईघाईने किंवा लवकर गोव्याची सहल आटोपत नाही. ब्रिटनमध्ये हिंवाळा असतो तेव्हा ब्रिटिश पर्यटक येथे भेट देत असतात.

Web Title: Thirty First Celebration! Large number of tourists from Russia, Kazakhstan in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा