दूधसागर नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू
By admin | Published: April 26, 2015 01:30 AM2015-04-26T01:30:15+5:302015-04-26T01:36:22+5:30
कुळे : येथील गणेश मंदिराच्या मागील बाजूस दूधसागर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
कुळे : येथील गणेश मंदिराच्या मागील बाजूस दूधसागर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ऋतिक शिवाप्पा नंदकिरे (वय १४, रा. कर्नाटक), मेहक बसवराज कंडुगेली (वय १२) व मंतेश बसवराज कुंडुगेली (वय ६, दोघेही रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी १२.३0 वाजता ही घटना घडली. दुर्दैव म्हणजे या मुलांच्या माता त्याच ठिकाणी कपडे धूत होत्या. मात्र, डोहात बुडणाऱ्या मुलांकडे पाठ असल्याने ती बुडाल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. जेव्हा त्यांना मुलांचा आवाज येत नाही असे लक्षात आले, तोपर्यंत उशीर झाला होता.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, काशिबाई शिवाप्पा नंदकिरे ही आपला मुलगा ऋतिकसमवेत कर्नाटकहून, तर मंगला बसवराज कंडुगेली ही आपली मुले मेहक व मंतेश यांच्यासमवेत मुंबईहून कुळेला आपल्या माहेरी सुट्टीनिमित्त आल्या होत्या. काशिबाई नंदकिरे व मंगला कंडुगेली या सख्ख्या बहिणी शुक्रवारीच कुळे येथे आल्या होत्या. शनिवारी बारा वाजण्याच्या सुमारास दोघी बहिणी तीन बालकांसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धूत असताना मुले पाण्यात आंघोळीसाठी उतरली. ती ज्या ठिकाणी उतरली, त्या ठिकाणी
खोल डोह होता. (पान २ वर)