खून केलेल्या तिघा कैद्यांची तुरूंगातून सुटका होणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 07:40 PM2018-06-18T19:40:36+5:302018-06-18T19:40:36+5:30
गेली अनेक वर्षे तुरुंगात शिक्षा भोगणा:या कैद्यांपैकी काही कैदी हे आजारी आहेत तर काहीजणांचे खूप वय झालेले आहे.
पणजी : गेली अनेक वर्षे तुरुंगात शिक्षा भोगणा:या कैद्यांपैकी काही कैदी हे आजारी आहेत तर काहीजणांचे खूप वय झालेले आहे. अशा कैद्यांपैकी तिघांची तुरुंगातून मुक्तता करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या तीनपैकी शिवय्या मरिहाल हा पूर्णपणो अंध आहे व त्याने खून प्रकरणी तेरा वर्षाची शिक्षा यापूर्वी भोगलेली आहे. आता मुक्त केल्या जाणा:या तिन्ही आरोपींना खून प्रकरणीच शिक्षा झालेली होती.
रघुनाथ नाईक यास वयाची 91 वर्षे झालेली आहे. त्याने 11 वर्षे व 8 महिने अशी शिक्षा भोगलेली आहे. त्याचाही गुन्हा खुनाचाच आहे. मारिओ डिसिल्वा हा 73 वर्षे वयाचा आहे व त्याने 13 वर्षे व 4 महिने एवढा काळ शिक्षा भोगलेली आहे. शिवय्या मरिहाल हा 64 वर्षीय आरोपी 13 वर्षे तुरुंगात आहे. त्याला दोन्ही डोळ्य़ांनी काहीच दिसत नाही. अशा कैद्यांची सुटका केली जावी, अशी इच्छा राज्यपालांनीही व्यक्त केली होती. सरकारने कायद्याच्या चौकटीत या विषयाचा अभ्यास करून पाहिला. न्यायालयाचेही मत घेतले. मंत्रिमंडळासमोर सोमवारी हा विषय आला व त्यावेळी तिन्ही आरोपींची सुटका करण्याची शिफारस राज्यपालांना करावी, असे मंत्रिमंडळाने ठरवले. दिलकुमारी थापा ह्या महिला कैद्याने 6 वर्षे 10 महिन्यांची शिक्षा भोगलेली आहे. अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी तिला शिक्षा झाली होती. तिच्या सुटकेचा निर्णय मात्र न्यायालयीन आक्षेपामुळे झालेला नाही.
मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. कैद्यांविषयीच्या निर्णयाची माहिती र्पीकर यांनी दिली. तीन कैद्यांची उर्वरित शिक्षा माफ करून त्यांना सोडले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात कॅन्सर रुग्णांसाठी विभाग स्थापन केला जाणार आहे. त्यासाठी डॉ. अनुपमा बोरकर यांची सल्लागार म्हणून कंत्रट पद्धतीवर नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. प्रथम त्यांना एक वर्षासाठी दर महा तीन लाख रुपयांच्या वेतनावर नेमले जाईल. कन्सल्टंट ऑन्कोलॉजीस्ट-हेमाटोलॉजीस्ट असे त्यांचे पद असेल. गोमेकॉत सर्जिकल आँकोलॉजी आणि रेडिएशन आँकोलॉजी सेवा सुरू करण्यासाठीही डॉ. बोरकर मदत करतील.