पुतळाप्रश्नी तीन पक्षांची युती, भाजपाचा विरोध कायम, राजकारण रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 06:25 PM2018-02-03T18:25:26+5:302018-02-03T18:26:19+5:30

स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या विषयावरून तीन राजकीय पक्षांची अलिखित युती झालेली आहे

The three parties' alliance for the statue, the opposition of the BJP, will continue to play politics | पुतळाप्रश्नी तीन पक्षांची युती, भाजपाचा विरोध कायम, राजकारण रंगणार

पुतळाप्रश्नी तीन पक्षांची युती, भाजपाचा विरोध कायम, राजकारण रंगणार

Next

पणजी : स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या विषयावरून तीन राजकीय पक्षांची अलिखित युती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पुतळा व्हायलाच हवा अशी भूमिका घेत ठरावाची नोटीस विधिमंडळ खात्याला सादर केली आहे. काँग्रेस पक्षानेही ठराव मांडण्याचे ठरवले आहे. भाजपने मात्र यापूर्वी ठरावाद्वारे घेतलेली भूमिका कायम ठेवली आहे.
विधानसभेसमोर जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे आमदार चर्चिल आलेमाव आणि प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी शनिवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. जनमत कौल चळवळीचे सिक्वेरा हे एकमेव नेते होते. त्यामुळे त्यांचा पुतळा स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्य़ाच्या शेजारी विधानसभेसमोर उभा रहायला हवा, असे चर्चिल म्हणाले. सिक्वेरा यांनी गोव्याला विलीनीकरणाविरुद्ध नेतृत्व दिले नसते तर गोवा हा महाराष्ट्र राज्याचा एक अतिशय छोटा भाग बनून राहिला असता. जनमत कौल घ्यावी ही कल्पनाच मुळी सिक्वेरा यांची होती, असा दावा आलेमाव यांनी केला. महाराष्ट्रात गोव्याचे विलीनीकरण करण्याच्या विरोधात केवळ ािस्ती मतदारांनीच मतदान केले असे मुळीच नाही तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू मतदारांनीही विलीनीकरणाविरुद्ध मतदान केले आहे. म्हणूनच गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहिले, असे आलेमाव म्हणाले.
पर्रीकर पाठिंबा देतील 
काँग्रेस पक्षाच्या सोळा आमदारांनी सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासाठी विधानसभेत ठराव आणण्याचे ठरविले आहे पण आपण गेल्या 2क् रोजीच विधिमंडळ खात्याला ठरावाबाबतची नोटीस सादर केली आहे. आपण ठराव मांडणार आहे. आपल्याला सर्वानी पाठींबा द्यावा. भाजपने कुणाचाच पुतळा विधानसभेसमोर नको, असा ठराव पक्षाच्या बैठकीत घेतलेला असला तरी, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा या आमच्या भूमिकेला विधानसभेत पाठींबा देतील, असा दावा आलेमाव यांनी केला. मुख्यमंत्री र्पीकर यांनी स्वत: सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही, असे आलेमाव म्हणाले.
मंत्री विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची भूमिका समान आहे. तिन्ही पक्षांना सिक्वेरा यांचे योगदान मान्य असून तिन्ही पक्षांना पुतळा उभा राहिलेला हवा आहे. आमदार मायकल लोबो यांचाही पाठींबा आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने पुतळ्य़ासाठी आपण सर्व ते प्रयत्न करू असे यापूर्वी म्हटलेले आहे. आता चर्चिल आलेमाव यांच्या ठरावाला सरदेसाई यांच्यासह सर्वानी पाठींबा द्यावा, असे जुङो फिलिप म्हणाले. या विषयावरून सरकार मात्र पडण्याची शक्यता नाही, असे आलेमाव यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले.
दरम्यान, भाजपचे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी शनिवारी येथे भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेचा विषय हा केंद्रीय अर्थसंकल्प हा होता. तथापि, सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी काँग्रेसने केलेल्या मागणीबाबत काय वाटते असे पत्रकारांनी विचारले असता, भाजपची भूमिका तिच आपली भूमिका असल्याचे सांगितले.

भाजपने ठरावाद्वारे पुतळ्य़ांबाबत जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेशी मी सहमत आहे. भाजपने ठराव्दारे स्पष्टपणो भूमिका मांडली आहे. तिच माझीही भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या ठरावाविषयी मंत्री विजय सरदेसाई यांनी कोणती भूमिका घेतली आहे, ते आम्हाला ठाऊक नाही. फक्त वर्तमानपत्रंमध्ये थोडेफार वाचले आहे. विधानसभेत भाजपने कोणती भूमिका घ्यावी ते भाजप विधिमंडळ पक्ष ठरवील.
- नरेंद्र सावईकर, भाजपचे दक्षिण गोवा खासदार

Web Title: The three parties' alliance for the statue, the opposition of the BJP, will continue to play politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.