बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी कल्याणच्या तीन पर्यटकांना गोव्यात अटक
By किशोर कुबल | Published: December 6, 2023 11:31 PM2023-12-06T23:31:50+5:302023-12-06T23:32:19+5:30
बेदरकारपणे वाहन हाकून हे पर्यटक स्टंट करीत होते, असा आरोप आहे.
पणजी : गोव्यात मजा करण्यासाठी येणारे पर्यटक येथे आल्यानंतर धिंगाणा घालतात. अशाच एका प्रकरणात बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावरील इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कारच्या चालकासह तीन पर्यटकांना आज रात्री उशिरा जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे. बेदरकारपणे वाहन हाकून हे पर्यटक स्टंट करीत होते, असा आरोप आहे.
विशाल पारेकर (४३, कल्याण, महाराष्ट्र) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद राफिक जांबोटकर यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी वाहनातील इतर प्रवाशांनाही अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
गोव्याच्या किनाऱ्यांवर तसेच धबधब्यांवर मद्य प्राशन करून जीव गमावणारेही पर्यटक आहेत. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहे. त्यामुळेच २००८ साली काँग्रेसचे सरकार असताना गोव्यात जीव रक्षक नेमण्यात आले. मुंबईची दृष्टी लाईफ सेविंग कंपनी जीवरक्षकांची सेवा देत असून गोव्यात विविध किनारे, धबधबे तसेच इतर मोठ्या जलस्रोतांच्या ठिकाणी ६०० हून अधिक जीव रक्षक तैनात आहेत.
जुने गोवेंत ४ रोजी जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चचे फेस्त झाले. हजारो भाविकांची गर्दी या ठिकाणी होती. याच दरम्यान पर्यटकांनी हा धिंगाणा घातला.