वाघ यांची प्रकृती स्थिर

By admin | Published: August 20, 2016 02:24 AM2016-08-20T02:24:22+5:302016-08-20T02:24:22+5:30

पणजी/मुंबई : भाजपचे आमदार व साहित्यिक विष्णू वाघ यांच्यावर माहिम-मुंबई येथील हिंदुजा इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत

Tiger's condition is stable | वाघ यांची प्रकृती स्थिर

वाघ यांची प्रकृती स्थिर

Next

पणजी/मुंबई : भाजपचे आमदार व साहित्यिक विष्णू वाघ यांच्यावर माहिम-मुंबई येथील हिंदुजा इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर यांनी मुंबईहून जाहीर केले.
डॉ. हेगडे यांच्यासह डॉ. पी. पी. अशोक (न्यूरो) आणि डॉ. घनश्याम
काणे (कार्डियाक) या तीन डॉक्टरांचे पथक वाघ यांच्यावर उपचार करत आहे. न्यूरो सर्जन डॉ. रामाणी यांनीही हिंदुजा इस्पितळास भेट दिली व वाघ यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. लोकांनी उगाच वाघ यांच्याविषयी कसल्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन खेडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
दरम्यान, विष्णू वाघ यांच्याकडून उपचारांना किती प्रतिसाद मिळतो ते कळण्यासाठी २४ तास थांबावे लागेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण दर तीन-चार तासांनी संबंधितांकडे विचारपूस करून माहिती जाणून घेत आहे.
सूत्रांनी सांगितले की, वाघ हे अद्याप व्हेन्टीलेटरवर असून त्यांचा मेंदू कार्यान्वित व्हावा म्हणून डॉक्टर प्रयत्न करत आहेत. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातून गुरुवारी रात्री वाघ यांना मुंबईच्या इस्पितळात हलविण्यात आले. वाघ हे गोमेकॉतही चार दिवस व्हेन्टीलेटरवरच होते. त्यांना प्रथम गेल्या मे महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी गोमेकॉतच त्यांना रक्तदाब वाढून हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यांचे हृदय प्रथम आठ मिनिटे बंद पडले होते; पण नंतर ते पूर्ववत झाले होते. (खास प्रतिनिधी)

Web Title: Tiger's condition is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.