कोट्यवधींची बिले थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 02:09 AM2016-04-18T02:09:40+5:302016-04-18T02:13:50+5:30
पणजी बांधकाम खात्यात कंत्राटदारांची बिले थकण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून आर्थिक चणचणीमुळे सरकारला ही बिले फेडता
पणजी बांधकाम खात्यात कंत्राटदारांची बिले थकण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून आर्थिक चणचणीमुळे सरकारला ही बिले फेडता आलेली नाहीत. ही माहिती आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून पुढे आली आहे. सुमारे १५0 कोटींहून अधिक रकमेची बिले थकल्याची माहिती मिळते. एका प्रकरणात तर पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रार पोचल्यानंतर तेथून राज्याच्या मुख्य सचिवांना योग्य त्या कारवाईचे निर्देश देणारे पत्रही आले आहे.
पर्वरीतील बांधकाम विभाग-१७ कडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून बिले पडून राहण्याचे कारण निधीचा अभाव हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक वर्षाहून अधिक काळ पडून असलेल्या बिलांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आरटीआय अर्ज केले असता केवळ पर्वरीच्याच या विभागातून तब्बल ३४ लाख रुपयांची बिले थकल्याचे आढळून आले. बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता या बाबतीत कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. काही बिले थकलेली आहेत यास मात्र दुजोरा देण्यात आला.
रस्ते बांधकाम, हॉटमिक्स डांबरीकरण, पाण्यासाठी पाईपलाईन टाकणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे आदी कामांसाठी निविदा काढून वर्क आॅर्डर दिली जाते; मात्र बिले फेडण्याच्या बाबतीत सरकारकडून विलंब होतो. अशा प्रकारांमुळे याआधी कंत्राटदाराकडून आत्महत्येचाही प्रकार घडला आहे.