जुने गोवे येथील ईको टुरीझम प्रकल्पाला टीएमसीचा विरोध; परवानगी मागे घेण्याची उद्योग खात्याकडे मागणी

By पूजा प्रभूगावकर | Published: October 31, 2023 01:02 PM2023-10-31T13:02:06+5:302023-10-31T13:02:25+5:30

जुने गोवे परिसरात हा ईको टुरीझम प्रकल्पाच्या नावाखाली येणाऱ्या या प्रकल्पामुळे तेथील पर्यावरणाची मोठी हानी होईल.

TMC's opposition to eco-tourism project in Old Goa; Request to Industries Department to withdraw permission | जुने गोवे येथील ईको टुरीझम प्रकल्पाला टीएमसीचा विरोध; परवानगी मागे घेण्याची उद्योग खात्याकडे मागणी

जुने गोवे येथील ईको टुरीझम प्रकल्पाला टीएमसीचा विरोध; परवानगी मागे घेण्याची उद्योग खात्याकडे मागणी

पणजी: धावजी - जुने गोवे येथे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळा (आयपीबी)अंतर्गत येणाऱ्या ईको टुरीझम प्रकल्पाला तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी ) गोवाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला दिलेली परवानगी मागे घ्यावी या मागणीचे निवेदन उद्योग, व्यापार व वाणिज्य खात्याला त्यांनी सादर केले.

जुने गोवे परिसरात हा ईको टुरीझम प्रकल्पाच्या नावाखाली येणाऱ्या या प्रकल्पामुळे तेथील पर्यावरणाची मोठी हानी होईल. सदर प्रकल्पाविरोधात गोवा टीएमसी ने हरकत नोंदवली आहे. या प्रकल्पाला दिलेली परवानगी मागे घेऊन प्रकल्पच रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली.

वळवईकर म्हणाले, की धावजी येथे सुमारे १० हजार चौरस मीटर जागेत हा ईको टुरीझम प्रकल्प येणार आहे. या प्रकल्पाविषयी स्थानिक जुने गोवे पंचायतीला अंधारात ठेवले आहे. जुने गोवे येथे अनेक वारसास्थळे असून त्यांना युनेस्को कडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी अशा प्रकल्पाचे आले तरी तर या वारसास्थळांची हानी पोचण्याची भीती आहे. ईको टुरीझम प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकसान नको असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: TMC's opposition to eco-tourism project in Old Goa; Request to Industries Department to withdraw permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.