सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना सरकारतर्फे राज्य सहकार पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:41 PM2023-12-18T18:41:27+5:302023-12-18T18:41:54+5:30
यावेळी त्यांच्यासोबत या समितीचे सदस्य वल्लभ साळकर, दुर्गादास गावडे, समीर मोरजकर, महेश नाईक व इतर उपस्थित होते.
पणजी: गोवा सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना सरकारतर्फे राज्य सहकार पुरस्कार देण्यात येणार असून सहा जणांच्या समितीमार्फत या पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्जही आले आहेत. अशी माहिती राज्य सहकारी बॅँकचे अध्यक्ष व या समितीचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत या समितीचे सदस्य वल्लभ साळकर, दुर्गादास गावडे, समीर मोरजकर, महेश नाईक व इतर उपस्थित होते.
पुरस्कार खालीलप्रमाणे -
गोवा सहकार रत्न या पुरस्कार विजेत्याला मानचिन्ह व १,२५,००० देण्यात येणार. तसेच गोवा सहकार भुषण पुरस्कारासाठी मानचिन्ह व ७५,००० हजार रुपये, गाेवा सहकार श्री यासाठी मानचिन्ह व ५०, ००० हजार रुपये देण्यात येणार तसेच गोवा राज्य उत्कृष्ट सहकार साेसायटी पुरस्कार तसेच गाेवा राज्य उत्तेजनार्थ सहकार साेसायटी ीपुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रांत चांगली कामगिरी केलेल्या दोन कर्मचाऱ्यांना ५० हजाराचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
अध्यक्ष उल्हास फळदेसाई म्हणाले, या सर्व पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक निवड हाेणार आहे. त्यांच्या कामाची याेग्य दखल घेउन हे पुरस्कार देण्यात येणार आहे .यात कुणावरच अन्याय हाेणार नाही. गोवा सहकार रत्न, भुषण आणि श्री या पुरस्कारांसाठी ३८ अर्ज आले आहेत. यातील तीन जणांची निवड केली जाणार आहे. तर सहकारी क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या पुरस्कारांसाठी ३६ अर्ज आले आहेत. यातील दोघांना हा पुरस्कार दिला जाणार आहे, असेही उल्हास फळदेसाई यांनी सांगितले.