भगवान श्रीरामांचा आदर्श आजच्या पिढीने ठेवावा: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:17 AM2023-04-19T09:17:17+5:302023-04-19T09:18:00+5:30
वास्कोत एक भारत श्रेष्ठ भारत कवी संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: 'आपली येणारी पिढी कुणासारखी बनयला हवी, हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा साहजिकच भगवान श्रीरामाचे नाव समोर येते. त्यांचे आदर्श गुण आत्मसात केल्यास आपली जीवननौका निश्चितपणे भवसागर पार करू शकेल,' असे विचार केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी प्रगट केले.
हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईकमायंडेड इंडियन्स या संस्थेतर्फे मांगेरहिल येथील राममंदिराच्या सभागृहात आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत' या कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त डीजीपी डॉ इंद्रदेव शुक्ला, जय भारत मंचचे आश्रयदाते गिरीश जुयल, गोवा शीपयार्डचे अभिषेक, आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोयी, बांबोळी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य आर. ए. पाटील, वास्को केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सी. बी. तिवारी, बीपीसीएलचे प्रांत व्यवस्थापक अभिजीत पनारी, आयएनएस मांडवी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य रवी प्रताप सिंग आदी उपस्थित होते.
संमेलनात संजीव दुबे (झांसी), अभिराम पाठक (चत्तरपूर), रवी शंकर चतुर्वेदी (सतना), विकास बौखल (बाराबांकी) भोपालचे डॉ. अनू सयान यांनी कविता सादर केल्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.
विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. हेल्पफूल ऑर्गनायझेशन फॉर लाईकमायन्डेड इंडियन्स संस्थेचे अध्यक्ष कमलाकर चतुर्वेदी यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव सुरज नाईक यांनी आभार व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"