गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त

By पूजा प्रभूगावकर | Published: June 30, 2024 05:26 PM2024-06-30T17:26:13+5:302024-06-30T17:27:38+5:30

टोमॅटोच्या दरात १० रुपयांनी घट होत तो ८० रुपयांवरुन ७० रुपये किलो झाला आहे.

Tomatoes cheaper by Rs 10 in Goa state | गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त

गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त

पणजी: वालपापडी व टोमॅटोच्या दरात किंचीत घट झाली आहे. सध्या वालपापडी १८० ते २०० रुपये किलो झाली आहे, तर टोमॅटोच्या दरात १० रुपयांनी घट होत तो ८० रुपयांवरुन ७० रुपये किलो झाला आहे.

 भाज्यांच्या किंमतीत किंचीत घट होत असतानाच नारळ मात्र अद्याप महागलेलाच आहे. पणजी बाजारात लहान आकाराचा नारळ १८ ते २० रुपये, मध्यम २५ रुपये तर माेठया आकाराचा नारळ ३० ते ३५ रुपयांना या दराने मिळत आहे. नारळ महागल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.

मागील काही दिवसांपासून वालपापडीचा दर चढेच आहे. मध्यंतरी वालपापडी २४० रुपये किलो पर्यंत पोहचली होती. सध्या मात्र त्याच्या किंमतीत ४० रुपयांनी घट झाली आहे. टोमॅटोही स्वस्त झाला आहे. पणजी बाजारात मात्र भाजी विक्रेते  ७० तर काही ८० रुपये किलो या वेगवेगळ्या दराने टोमॅटोची  विक्री करीत आहेत.

Web Title: Tomatoes cheaper by Rs 10 in Goa state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.