जुन्या झालेल्या बसेसला कासवाची गती; त्या वेळेत कशा पोहोचतील साहेब?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:09 PM2023-02-06T18:09:33+5:302023-02-06T18:10:48+5:30
प्रवासाला प्रवासी वैतागले, इलेक्ट्रिक बस प्रवास सोयीचा
पणजी : नवीन इलेट्रिक बसगाड्या सुरू झालेल्या असल्या तरी कदंबा परीवहन महामंडळाच्या जुन्या बसगाड्याही रस्त्यावर धावत आहेत. या बसगाड्या कासवाच्या गतीने धावतात, असे प्रवासी म्हणतात. कदंबाच्या जुन्या बसगाड्यांचा खुळखुळा झाला आहे.
प्रवासी प्रवास करत असताना या बसगाड्यांच्या खिडक्या एकमेकांवर जोराने आदळत असतात. सीट फाटलेल्या असतात. पावसाच्या दिवसात छप्पर गळते. पण तरीही या गाड्या सुरुच आहेत. या बसगाड्या बारंबार मोडतात तेव्हा प्रवाश्यांनाही त्रास होतो. कदंबा बसगाडीचा कधी टायर पंक्चर होतो, गियर न पडणे, ब्रेकडाऊन अशा समस्या वारंवार येतात. दुरुस्त केल्या तरी जुन्या बसगाडया वारंवार मोडतात.
कासवगतीने प्रवासी त्रस्त
कदंबा बसगाड्या कासवाच्या गतीने जात असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. जुन्या बसगाडीत त्यांना प्रवास नकोसा होतो. या बसगाड्या स्क्रॅपमध्ये काढाव्यात असे प्रवासी सांगतात.
जुन्या बस होणार स्क्रॅप
सध्या गोव्यात कदंबच्या ताफ्यामध्ये सुमारे १२० गाड्या जुन्या आहेत. त्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. सध्या कदंब महामंडळाने इलेक्ट्रिक गाड्या आपल्या ताफ्यात आणण्यावर भर दिला आहे. आगामी सहा महिन्यात आणखी १०० बस ताफ्यात दाखल होणार आहेत.
आता राज्यभरात नवीन इलेट्रिक बसगाड्या सुरू करा. जुन्या बसगाड्या कशाला अजून चालवतात. सरकारकडे महसूल येतो, तेव्हा तो प्रवाशांच्या सोयींवरही थोडा खर्च करावा. नीता वळवईकर, डिचोली
अशी आहे आकडेवारी - कदंबाच्या दुरुस्तीवर खर्च
२०१७-१८ - ५ कोटी ४४ लाख
२०१८-१९ - ७ कोटी ३८ लाख
२०१९-२० - ७ कोटी २४ लाख
२०२०-२१ - २ कोटी ४५ लाख
२०१२१-२२ - सुमारे १ कोटी ७३ लाख
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"