ताळगाव पंचायतीसाठी एकूण २४ उमेदवारी अर्ज; २९ एप्रिलला मतमोजणी
By पूजा प्रभूगावकर | Published: April 18, 2024 05:14 PM2024-04-18T17:14:24+5:302024-04-18T17:14:53+5:30
ताळगाव पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी आठ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: ताळगाव पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी आठ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. निवडणूकीसाठी एकूण २२ उमेदवारांनी २४ अर्ज सादर केले आहेत.
ताळगाव पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज १२ एप्रिलपासून स्वीकारले जात होते. शुक्रवारी १९ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर शनिवारी २० एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. ताळगाव पंचायतीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होईल तर सोमवारी (दि. २९) मतमोजणी होईल.
निवडणूकीसाठी गुरुवारी आठ उमेदवारांनी अर्ज सादर केले. यात प्रभाग १ मधून मयुर उसकैईकर, प्रभाग २ मधून डॉमिंगोस जोस डा कुन्हा, प्रभाग ३ मधून एमी उसबियो रॉड्रिग्स, प्रभाग ४ मधून माधवी काणकोणकर, प्रभाग ६ मधून प्रतिमा चंद्रशेखर शिरोडकर, प्रभाग ७ मधून विजु महेंद्र दिवकर व प्रभाग ११ मधून सिडनी बर्रेटा आणिक कॅंडिडो डायस या उमेदवारांचा समावेश आहे.