गोव्यात 2 जानेवारीला समुद्राची भरती वाढणार, पर्यटन खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 04:57 PM2017-12-30T16:57:13+5:302017-12-30T16:57:26+5:30
येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि जलक्रिडा व्यवसायिकांना दिला आहे.
सदगुरू पाटील
पणजी : येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि जलक्रिडा व्यवसायिकांना दिला आहे.
उत्तर गोव्याच्या जिल्हाधिका:यांनी पर्यटन खात्याला संदेश पाठवून सतर्क केले. समुद्रातील भरतीचे प्रमाण दि. 2 जानेवारी व दि. 31 जानेवारीला खूप वाढू शकते, असे पर्यटन खात्याला कळविले. यामुळे पर्यटन खात्याचे संचालक मिनिन डिसोझा यांनी एक कार्यालयीन निवेदन जारी केले आहे व किनारपट्टीत शॅक्स व्यवसाय करणारे आणि जलक्रिडांसारखे उपक्रम किना-यांवर राबविणारे व्यवसायिक यांना सतर्क केले आहे. समुद्रातील पाणी वाढले तर किना-यावर पूर येईल, त्यामुळे काळजी घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असे पर्यटन खात्याने किना-यावरील व्यवसायिकांना कळवले आहे. दि. 2 व दि. 31 जानेवीराला सुपरमून आहे. पृथ्वीला त्यादिवशी चंद्र अतिशय जवळ असेल. त्यामुळे दि. 1, दि. 2 दि. 31 जानेवारी असे तीन दिवस किनारपट्टीतील व्यवसायिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पर्यटन खात्याने दिल्याचे अधिका:यांनी स्पष्ट केले.
दि. 1 व दि. 2 जानेवारीला लाखो पर्यटक गोव्याच्या किनारपट्टीत असतील. नववर्ष साजरे करण्याची धूम दि. 31 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. हजारो पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दृष्टीस पडतात. मालमत्तेची हानी व जीवितहानीही होऊ नये म्हणून पर्यटन खात्याने यावेळी अगोदरच सुपर मुनची कल्पना सर्वाना दिली आहे. दि. 31 जानेवारीलाही बरेच पर्यटक किना:यांवर असतील. उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी, हणजुणा, बागा, सिकेरी, दोनापावल, दक्षिण गोव्यातील कोलवा व अन्य किना:यांवर ब:याच जलक्रिडा सध्याच्या दिवसांत चालतात. राज्याच्या पूर्णकिनारपट्टीत साडेतीनशेपेक्षा जास्त शॅक्स (पर्यटन गाळे) आहेत.
दरम्यान, गेल्या महिन्यात अचानक समुद्रातील पाण्याची पातळी खूप वाढली होती व पाणी उत्तर व दक्षिण गोव्यातील शॅकमध्ये जाऊन बरेच नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारच्या कोणत्याही यंत्रणोने आपल्याला पूर्वकल्पना दिली नव्हती अशी तक्रार शॅक व्यवसायिकांनी केली होती. शॅकमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी, अजुनही सरकार नुकसान भरपाई देऊ शकलेले नाही. अजून नुकसानीचा आढावाच घेतला जात आहे.