पर्यटन क्षेत्रासाठी गोवा-जपान हातमिळवणी, जपानच्या कोन्सुलेट जनरलनी घेतली पर्यटन संचालकांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 06:12 PM2018-09-06T18:12:41+5:302018-09-06T18:13:13+5:30
पर्यटन क्षेत्रासाठी जपानचे गोव्याला सहकार्य मिळणार असून, जपानचे कोन्सुलेट जनरल -योजी नोडा यांनी गुरुवारी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.
पणजी : पर्यटन क्षेत्रासाठी जपानचे गोव्याला सहकार्य मिळणार असून, जपानचे कोन्सुलेट जनरल -योजी नोडा यांनी गुरुवारी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. जपानचे सुमारे २५0 पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देतात, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. हे पर्यटक दाबोळी विमानतळावर इलेक्ट्रॉनिक टुरिस्ट व्हिसा सुविधेचा लाभ घेत असतात. येत्या नोव्हेंबरमध्ये जेसीआय जागतिक परिषद गोव्यात होत असून, जपानचे १२00 प्रतिनिधी त्यास हजेरी लावणार आहेत. विविध देशांमधून एकूण ४ हजार प्रतिनिधी या परिषदेत भाग घेतील.
गोव्यातील लोकांच्या आदरातिथ्याने आपण भारावून गेलो आहोत, असे नोडा यांनी डिसोझा यांच्याशी बोलताना सांगितले. जपानच्या मुंबई येथील कोन्सुलेट जनरल कार्यालयातील सल्लागार आयाको युअेनो, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शर्मा हे यावेळी उपस्थित होते.