गोव्यात लोकसभा निवडणुकीत पर्यटन उद्योगाची घसरण मुख्य मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:08 PM2019-04-08T19:08:53+5:302019-04-08T19:09:31+5:30
गोव्यात पर्यटन उद्योगाची झालेली घसरण हादेखिल लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
पणजी - गोव्यात पर्यटन उद्योगाची झालेली घसरण हादेखिल लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांनी तसे बोलून दाखवले. पर्यटन उद्योगाच्या बाबतीत सरकारचे व्यवस्थापन कमी पडले असा आरोप केला जात आहे.
पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावताना या व्यवसायासाठी आवश्यक ते सर्व काही सरकार करीत असल्याचा दावा केला. राज्यात पर्यटकसंख्या घटल्याच्या वृत्ताला मंत्र्यांनी दुजोरा दिला. टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेचे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘ विदेशी पर्यटकांच्या संख्येत ४0 टक्क्यांनी घट झालेली आहे. हॉटेलांच्या खोल्यांना ग्राहक नाहीत. केवळ बैठका, परिषदा, प्रदर्शने यासाठीच हॉटेल्सचा वापर होताना दिसतो.
अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनीही सरकार पर्यटकसंख्या घटली असतानाही गंभीर नसल्याचा आरोप केला. किनाºयांवरील कचºयाची समस्या हासुध्दा मोठा प्रश्न आहे. गोव्याच्या पर्यटनात वृध्दी व्हावी यासाठी केंद्र सरकारने काहीच केले नाही. आमच्या समस्या दूर करणाºया उमेदवारांबरोबरच आम्ही राहणार आहोत, असे ते म्हणाले.
उत्तर गोवा टॅक्सीमालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर म्हणाले की, ‘यापूर्वी लोकसभा निवडणुकीत कधीच पर्यटनाचा मुद्दा नव्हता, मात्र यावेळी हा मुद्दा बनलेला आहे. पर्यटन उद्योगाच्या अस्तित्त्वाबाबत लोक चिंतेत आहेत.’ उबेर, ओला आदी परप्रांतीय टॅक्सी कंपन्यांना संघटनेचा विरोध आहे.