कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नकोत: पर्यटनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 08:20 PM2018-07-26T20:20:05+5:302018-07-26T20:20:07+5:30

किना-यांवर नशा करून हैदोस घालणारे व कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नको आहेत, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत सांगितले.

Tourists do not want Goa to waste: Tourism Minister | कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नकोत: पर्यटनमंत्री

कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नकोत: पर्यटनमंत्री

Next

पणजी:  किना-यांवर नशा करून हैदोस घालणारे व कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नको आहेत, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत सांगितले. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. दारू व ड्रग्सचा नशा करणारे, तसेच बाटल्या वगैरे फोडून इतरांना उपद्रव  करणारे पर्यटक गोव्याला नकोच आहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी सर्व यंत्रणे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांना योग्य आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीश यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. समुद्र किना-यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असतानाही कचरा कसा टाकला जातो. भारतीय राखीव दळाचे पोलीस, किनारा पोलीस,शिवाय दृष्टीचे कर्मचारी व इतर सुरक्षा असतानाही किना-यांवर कचरा टाकण्याचे प्रकार कसे होतात. भिकारी व लोकांना उपद्रव करणारे किना-यांवर कसे फिरू शकतात असा त्यांचा प्रश्न होता. कारण पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून अशा लोकांकडून लोकांना उपद्रव करण्याच्या ५०० घटना नोंद झाल्या आहेत त्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर उत्तर देताना पर्यटनमंत्री आजगावकर यांनी कारवाई केली तरी हे लोक पुन्हा किनाºयावर येतातच. तसेच कचरा टाकणा-यांवरही कारवाई सुरू असल्याचे क्यांनी सांगितले. आता कडक कारवाई करणार्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. गोव्याचे माव बदनाम करणारे असले पर्यटक गोव्याला नकोच आहेत असे त्यांनी सांगितले.

Web Title: Tourists do not want Goa to waste: Tourism Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.