उन्हाळी हंगामात पर्यटक वाढले; प्रवास तिकीट दरातही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 03:00 PM2024-03-18T15:00:21+5:302024-03-18T15:01:43+5:30
उन्हाळी हंगाम सध्या सुरु झाल्याने राज्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
नारायण गावस, पणजी: उन्हाळी हंगाम सध्या सुरु झाल्याने राज्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. आता आठवड्याची सुट्टीला पर्यटक माेठ्या प्रमाणात राज्यात दाखल होत आहेत. आता पुढील आठवड्याला गुडफ्रायडे तसेच शनिवार रविवार असे तीन दिवस सुट्टी असल्याने पुन्हा पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हॉटेल, शॅक्स फार्महाऊस फुल
राज्यातील बहुतांश हॉटेल, शॅक्स फार्महाऊस पर्यटकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुट्टीमुळे सर्व हॉटेल व्यावसाय शॅक्स व्यावसायिकांनी दरात वाढ केली आहे. सध्या उन्हाळी हंगामात जास्त पर्यटक येत असतात. या देशी पर्यटकांची संख्या जास्त असते. समुद्र किनाऱ्यावरील हॉटेल्स तसेच कळंगुट, बागा, काेलवा, मोरजी वागातोर या परिसरातील सर्व हॉटेल सध्या हाऊसफुल झाली आहेत. पर्यटकांनी माेठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकींग केलेले आहेत.
ट्रॅव्हल्स, विमान तिकीट दरात वाढ
जशी पर्यटकांची संख्या वाढते तशी तिकीट दरातही वाढ केली जाते. सध्या मुंबई, पुणे,बेंगलाेर या सारख्या शहरातून येणाऱ्या ट्रँव्हलसनी तिकीटाच्या दरात वाढ केली आहे. सध्या मुंबई ते गोवा १२०० रुपये दर आकारला जातो ताेच आठवड्याच्या सुट्टीला १७०० रुपये आकारले जातात. तसेच विमान प्रवासाचा दरही वाढला आहे. मुंबई ते गोवा दिली ते गोवा अशा विमानाच्या प्रवास तिकीटदरातही २ ते ३ हजार वाढ केले जाते.
गोव्यात वर्षाचे बाराही महिने पर्यटक येत असतात. त्यात जर जाेडून सुट्टी मिळाली तर पर्यटकांची संख्या जास्त असते. आता उन्हाळी हंगामात पर्यटक जास्त येतात. बहुतांश पर्यटक गाेव्यातील रिसाेर्ट फार्महाऊसवर येतात. यंदा विदेशी पेक्षा देशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. आठवड्याची सुट्टी किंवा जाेडून सुट्टी असल्यावर तिकीट दरात वाढ होत असते. ऐरव्ही दरात वाढ होत असते. बहुतांश हॉटेल पर्यटकांनी फुल आहेत, असे टूर ॲण्ड ट्रँव्हल्स गोवा असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा यांनी सांगितले.