महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:30 PM2018-12-26T13:30:15+5:302018-12-26T13:30:28+5:30

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो.

tourists rejects expensive hotels; Avoid spending in coastal areas | महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

googlenewsNext

म्हापसा : सुट्टीच्या दिवसात गोव्यात येवून सुट्टी घालवणे म्हणजे खर्चीक बाब असते. सुट्टीच्या दिवसात पर्यटन स्थळांतील किंमती वाढवल्या जातात. त्यामुळे आवाक्या बाहेरील महागडा खर्च करण्यापेक्षा गाडीतून येवून सुट्टी साजरी करणे व पुन्हा माघारी जाणे परवडण्यासारखे असल्याचे मत नाताळानिमित्त गोव्यात आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केले आहे. गरजेच्या वस्तूवर अव्वाच्या सव्वा किंमती लावल्या जात असल्याने त्यातून नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली आहे.


नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो. चांगले वातावरण त्यात नाताळचे दिवस असल्याने आयोजित होणाऱ्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे पर्यटक गोव्यात सुट्टीसाठी येण्यावर प्राधान्य देत असतात. काही दिवस सुट्टीत घालवल्यानंतर पुन्हा माघारी निघून जातात. या वर्षी गोव्यात येणाºया चार्टड विमानांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यातून विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. अशा वेळी पर्यटन व्यावसायिक देशी पर्यटकांवर अवलंबून होते. त्यांच्यावर व्यावसायिकांची सर्वात जास्त अपेक्षा होती; पण आलेल्या पर्यटकांना यंदा वर्षापेक्षा जास्त प्रमाणावर खर्च करावे लागले असल्याने किनारी भागातील व्यावसायिकांकडे जाणे देशी पर्यटकांनी टाळले आहे. 


व्यावसायिकांकडून विविध वस्तूवर न परवडणाऱ्या किंमती पर्यटकांवर लादल्या जात आहेत. या किंमती न परवडण्या सारख्या असल्याने जाणे टाळले असल्याची प्रतिक्रिया काही पर्यटकांनी दिली. किंमती वाढल्याने पर्यटकांनी किमान किनारी भागात तरी व्यवहार करण्याचे यावर्षी टाळले आहे. बहुतेक व्यवहारासाठी ते शहरी भागावर अवलंबून राहिले आहेत.  


वाढलेल्या किंमतीमुळे यंदा आलेल्या बहुतेक पर्यटकांनी स्वत:च्या वाहनातून येण्यावर प्राधान्य दिले आहे. किंमती वाढल्याने किनारी भागात हॉटेलाचा आसरा घेण्यापेक्षा एकतर त्यांनी स्वत:च्या वाहनाचा वापर केला किंवा शहरी भागात राहून किनारी भागात जाण्यावर भर दिला. काही पर्यटकांनी नाताळाची रात्र किनारी भागात मौज मजा करण्यात तेथे होणाऱ्या पार्ट्यात रंगण्यात घालवली. त्यानंतर आलेल्या गाडीतूनच माघारी जाणे पसंत केले. माघारी जाताना शहरात येवून गरजा भागवल्यानंतर माघारी निघून गेले. 


सुट्टीच्या दिवसात किनारी भागात हॉटेल्स, खाद्य पदार्थ किंवा इतर वस्तूंचे भाव इतर दिवसाच्या तुलनेत न परवडणारे असतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कशाही प्रकारे किंमती लावल्या जातात अशी माहिती नियमितपणे येणाºया काही पर्यटकांनी दिली आहे. गुजरातमधून आलेल्या एका पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार आपण मागील बºयाच वर्षांपासून सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येत असतो; पण या वर्षी मात्र न परवडणाºया किंमती लागू करुन केल्या असल्याचे लक्षात आल्याने किनारी भागात व्यवहार करणे टाळले असल्याचे सांगितले. कळंगुट परिसरातील काही व्यावसायिकांनी देशी पर्यटकांची संख्या सुद्धा कमी असल्याचे सांगितले. 

Web Title: tourists rejects expensive hotels; Avoid spending in coastal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.