पारंपरिक पर्यटन व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती रहावेत; अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:31 PM2023-03-29T18:31:59+5:302023-03-29T18:32:07+5:30

सरकार आमचे पारंपरिक पर्यटन व्यवसाय कॉर्पोरेट लॉबीच्या हाती देऊ पाहत आहे.

Traditional tourism businesses should remain in Gomantakis' hands; Demand of All Goa Tourism Stakeholders Association | पारंपरिक पर्यटन व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती रहावेत; अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटनेची मागणी

पारंपरिक पर्यटन व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती रहावेत; अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटनेची मागणी

googlenewsNext

पूजा प्रभूगावकर

पणजी : सरकार आमचे पारंपरिक पर्यटन व्यवसाय कॉर्पोरेट लॉबीच्या हाती देऊ पाहत आहे. पारंपरिक व्यवसाय हे गोमंतकीयांच्याच हाती रहावेत अशी जाेरदार मागणी अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटनेने केली आहे.

राज्यातील विविध पर्यटन संबंधित व्यवसायांना परवाने 

जारी करण्याचे काम गोवा इलेक्ट्रॉनिक्स अर्थात जीईएलकडे सोपवले आहे; मात्र भरमसाठ शुल्क आकारुन सुध्दा वेळेत परवाने मिळत नाही. सरकारने जीईएलकडून परवाने जारी करण्याचे काम काढून घेऊन ते पुन्हा पर्यटन खात्याकडे सोपवावे अशी मागणीही संघटनेने केली आहे.

राज्यातील किनारी शॅक्स व्यावसायिक, खासगी शॅक्स व्यावसायिक, टॅक्सीमालक, रेंट अ बाईक व्यावसायिक, जलक्रीडा व्यावसायिक, बार ॲण्ड रेस्टॉरंट व्यावसायिक, रापणकार मच्छीमार आदींनी एकत्र येऊन ही अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटना स्थापन केली आहे. त्यानुसार या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या.

Web Title: Traditional tourism businesses should remain in Gomantakis' hands; Demand of All Goa Tourism Stakeholders Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.