स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्ते खाेदल्याने मेरशी जंक्शनवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:08 PM2023-10-16T15:08:50+5:302023-10-16T15:10:00+5:30

काल सोमवार सकाळी फाेंडामार्ग तसेच साखळी मार्गे पणजीत येणारी वाहतूक मेरशी जंक्शनवर खूप वेळ राहावे लागले.

Traffic congestion at Mershi Junction due to road erosion due to Smart City, | स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्ते खाेदल्याने मेरशी जंक्शनवर वाहतूक कोंडी

स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्ते खाेदल्याने मेरशी जंक्शनवर वाहतूक कोंडी

पणजी: स्मार्ट सिटीची कामे आता रायबंदर भागात सुरु झाल्याने माेठ्याप्रमाणात वाहतूक काेंडी हाेत आहे. रायबंदरचा रस्ता बंद केल्याने वाहतूक बायपास महामार्गावरुन जात असल्याने मेरशे जग्शनवर वाहतुक काेंडी होत आहे. रविवार पासून रायबंदर सांडपाणी व मलनिसारण पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. त्यामुळे सोमवारी रायबंदरमार्गे पणजी येणारी वहतूक बंद होती. त्यामुळे काल मेरशी जंक्शनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे, कामगार विद्यार्थ्यांना त्रास झाला.

काल सोमवार सकाळी फाेंडामार्ग तसेच साखळी मार्गे पणजीत येणारी वाहतूक मेरशी जंक्शनवर खूप वेळ राहावे लागले. दुचाकी चालकांनी कशीबशी गाडी काढली पण चारचाकी व इतर अवजड वाहनांना मात्र रांगेत राहावे लागले. यामुळे बसमधून प्रवास करणारे प्रवाशी कामगार तसेच विद्यार्थी यांनी कार्यालयात कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाला. तसेच काही रुग्ण वाहीकांचे हाल झाले.

पर्यटकांना जाणवला त्रास
सध्या राज्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले पणजीतून ओल्ड गोव्याला जाताना त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. रायबंदरमध्ये रस्ता खोदल्याने पर्यटकांच्या गाड्या मेरशी जग्शनवर अडकून पडल्या. बायपास महामार्ग असल्याने वाहनांची रेलचेल जास्त आहे. पण मेरशी येथील असलेल्या सिग्नलसाठी वेळ लागतो. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असतात. या ठिकाणी वाहतूक पाेलीसही तैनात होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धावर होणार परिणाम
राज्यात आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने अनेकांना याचा फटका बसणार आहे. यात स्पर्धेसाठी अनेक प्रतिनिधी गाेव्यात येणार आहे. जर स्मार्ट सिटीची खाेदकामे अशीच सुरु राहिली तर त्याचा फटका लोकांना बसणार आहे. वाहतूक काेंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Traffic congestion at Mershi Junction due to road erosion due to Smart City,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.