वाहतूक अधिकाऱ्याच्या हणजुणेतील घरावर छापा
By admin | Published: September 15, 2015 02:31 AM2015-09-15T02:31:15+5:302015-09-15T02:32:02+5:30
पणजी : वाहतूक संचालनालयातील लाच प्रकरणात वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक विश्राम गोवेकर यांच्या हणजूण-कळंगुट येथील घरावर भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून (एसीबी
पणजी : वाहतूक संचालनालयातील लाच प्रकरणात वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक विश्राम गोवेकर यांच्या हणजूण-कळंगुट येथील घरावर भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून (एसीबी) सोमवारी छापा टाकण्यात आला. गोवेकर यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांना उद्या मंगळवारी चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
लाच घेताना रंगेहाथ अटक केलेला शिपाई दामू गावडे याने, गोवेकर यांनी तक्रारदाराकडून लाच घेण्यास सांगितल्याचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुली जबाबात म्हटले होते. गोवेकर यांच्या घरावर सकाळी छापा टाकला. छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच बँक खात्यांचे पासबुकही जप्त केले. सहसा एखाद्या व्यक्तीला अटक केल्यावर त्याच्या घरावर छापा टाकला जातो; परंतु अटक करण्यापूर्वीच अचानक टाकलेल्या या छाप्यामुळे गोवेकर कुटुंबीयांचा गोंधळ उडाला. (प्रतिनिधी)