रस्ता ओलांडताना सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; भरधाव चारचाकीने उडवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:51 AM2023-04-27T10:51:33+5:302023-04-27T10:52:04+5:30

सांकवाळ महामार्ग येथील घटना 

tragic end of a six year old boy while crossing the road was blown by a four wheeler | रस्ता ओलांडताना सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; भरधाव चारचाकीने उडवले 

रस्ता ओलांडताना सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; भरधाव चारचाकीने उडवले 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: सांकवाळ येथे रस्ता ओलांडणाऱ्या सहा वर्षीय चिमुरड्याचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. कुंदन ध्यानेश्वर राठोड (रा. झरी-झुआरीनगर) असे त्याचे नाव आहे. बुधवारी (दि. २६) संध्याकाळी ही घटना घडली.

कुंदन त्याच्या अन्य लहान मित्रांसोबत साकवाळ महामार्ग ओलांडत असताना समोरून येणाऱ्या चारचाकीची धडक बसली. यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडे चार वाजता कुंदन बिट्स पिलानी बाहेरील महामार्गाचा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. त्यासोबत इतर लहान मित्रही होते. रस्ता ओलांडत असतानाच समोरून आलेल्या चारचाकीची कुंदनला जबर धडक बसली. या धडकेत तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र, इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कपील बेटगिरी असे कारचालकाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वेर्णा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.

मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळाच्या शवागृहात पाठवून दिला आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: tragic end of a six year old boy while crossing the road was blown by a four wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.