झारखंड कामगाराच्या खून प्रकरणात त्रिकुटास अटक

By वासुदेव.पागी | Published: October 28, 2023 03:13 PM2023-10-28T15:13:54+5:302023-10-28T15:14:02+5:30

मयत फिलीप किसकोट्टा  हा तिन्ही संशयितांचा मित्र होता. सर्वजण दारुच्या नशेत असताना त्यांच्यात भांडण झाले

Trio arrested in Jharkhand laborer's murder case | झारखंड कामगाराच्या खून प्रकरणात त्रिकुटास अटक

झारखंड कामगाराच्या खून प्रकरणात त्रिकुटास अटक

पणजी: झारखंड येथील रहिवासी असलेल्या फिलीप किस्कोट्टा या ३८ वर्षीय कामगाराच्या खुनाचे गुढ उलघडले आहे. या खून प्रकरणात कुळे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

झारखंडच्या कामगाराच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पैकी दोघे कर्नाटकमधील तर एक महाराष्ट्रातील आहे. ४० वर्षीय रमेश दोडामणी आणि  २२ वर्षीय शइवम हे दोघे संशयित कर्नाटकमधील आहेत तर ५६ वर्षीय चंद्रकांत भाग्यवंत हा  महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. 

मयत फिलीप किसकोट्टा  हा तिन्ही संशयितांचा मित्र होता. सर्वजण दारुच्या नशेत असताना त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर किस्कोट्टाला त्यांनी मारहाण सुरू केली. त्यातच त्याचा जीवही गेला अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. किस्कोट्टा याचा नग्ग्नावस्थेतील मृतदेह कुळे  येथे रेल्वे मार्गजवळ सापडला होता.  या प्रकरणात कुळे पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
 

Web Title: Trio arrested in Jharkhand laborer's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.