ड्र्ग मुद्द्यावरून गोवा विधानसभेत हंगामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:47 PM2019-07-16T12:47:09+5:302019-07-16T12:47:16+5:30

पोलिसांची ड्रग्स डिलरशी हातमिळविणी असल्याचेही त्यांनी सांगितले, परंतु मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळताना पोलिलांनी ड्रग्सच्या विरोधात कारवाईंची आकडेवारीच सादर केली.

tumult in Goa Legislative Assembly on the Drug issue | ड्र्ग मुद्द्यावरून गोवा विधानसभेत हंगामा

ड्र्ग मुद्द्यावरून गोवा विधानसभेत हंगामा

Next

पणजीः ड्रग्स आणि महाविद्यालये या संबंधी आक्षेपार्ह विधान केले. या आलेक्स रेजिनाल्ड यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात जोरदार हंगामा झाला. वक्तव्य मागे घेण्याची विनंती रेजिनाल्ड यांनी फेटाळल्यानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी ते वक्त्व्य सभागृहाच्या कामगाजातून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. 

ड्रग्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता हा सत्ताधारी पक्षाचे सदस्य फ्रांसिस्क सिल्वेरा यांनी. पोलीस या विषयावर गंभीर नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. पोलिसांची ड्रग्स डिलरशी हातमिळविणी असल्याचेही त्यांनी सांगितले, परंतु मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळताना पोलिलांनी ड्रग्सच्या विरोधात कारवाईंची आकडेवारीच सादर केली . 

चर्चेत सहभागी होताना कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी ड्रग्स व महाविद्यालये यांचा संबंध लावण्याचे वक्त्व्य केले. त्याला मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला. मंत्री मायकल लोबो यांनीही आक्षेप घेतला आणि त्यांना हे वक्त्य मागे घेण्याची विनंती केली. रेजिनाल्ड यांनी ते वक्त्व्य मागे न घेतल्यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांनी तो भाग सभागृहाच्या कामगाजातून वगळल्याचे जाहीर केले.

Web Title: tumult in Goa Legislative Assembly on the Drug issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.