कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 04:27 PM2024-03-06T16:27:43+5:302024-03-06T16:28:42+5:30

कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला.

two bikes collided on kasarvarne road young woman died on the spot in pedne goa | कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला

कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला

निवृत्ती शिरोडकर ,पेडणे : कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन सुजाता सातार्डेकर (२५) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर फैजर फ्रान्सिस मास्करेन्हास (२२) हा युवक गंभीरित्या जखमी झाला. सकाळी ही घटना घडली.  
पोलिसांनी सांगितले की, सुजाता सातार्डेकर ही ((एमएच ०७ एटी ११५०) या दुचाकीवरून मोपा विमानतळावरुन कामावरून घरी परतत होती.
 यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात सुजाता हिच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या फायजर याच्या दुचाकीला (जीए ११ २१२८) धडक दिली. त्यात सुजाता जागीच ठार झाली.तर गंभीर जखमी फैजर मास्करेन्हास हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उचारासाठी पाठविण्यात आले. अपघाताचा पंचनामा मोपा पोलिसांनी केला. सुजाता ही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला होती. सकाळी कामावरून घरी परतताना कासारवर्णे येथे हा अपघात झाला. 

अपघातांची मालिकाच : दरम्यान, पेडणे तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असून अनेकांचे बळी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे किंवा अती वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात घडतात. काल राष्ट्रीय महामार्ग ६६ धारगळ-सुकेकुळ येथे सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) येथील संजय सुरेश दळवी यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला २४ तासही उलटले नसताना कासारवर्णेतील या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील सुजाता हिचा बळी गेला आहे.

Web Title: two bikes collided on kasarvarne road young woman died on the spot in pedne goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.