‘आयडीसी’चे दोन लाचखोर अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात
By Admin | Published: August 20, 2015 02:15 AM2015-08-20T02:15:52+5:302015-08-20T02:16:01+5:30
पणजी : मंजूर झालेला प्लॉट ताब्यात देण्यासाठी १ लाख रुपये लाच मागणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाचे (आयडीसी) फिल्ड मॅनेजर घनश्याम ऊर्फ
पणजी : मंजूर झालेला प्लॉट ताब्यात देण्यासाठी १ लाख रुपये लाच मागणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाचे (आयडीसी) फिल्ड मॅनेजर घनश्याम ऊर्फ दिलीप मालवणकर आणि अजित गावणेकर यांना भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली. पैकी घनश्याम हे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू
(मेहुणीचा पती) आहेत.
एसीबीकडून घनश्याम याला प्रत्यक्ष लाचेचे पैसे घेताना तुये येथील औद्योगिक वसाहतीत पकडण्यात आले, तर त्याचा साथिदार अजित गावणेकर याला आयडीसीच्या मुख्यालयातून पोलीस घेऊन गेले. या प्रकरणी एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी सायंकाळी तक्रार नोंद झाली होती आणि अत्यंत कमी वेळेत म्हणजे बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ‘एसीबी’ने व्यवस्थित सापळा रचून लाचखोरांना पकडले. घनश्यामला लाच देताना त्याचे आणि तक्रारदार यांच्यामधील संभाषणाचे रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. हा या प्रकरणातील सबळ पुरावा ठरला आहे.
(प्रतिनिधी)